आजचा विषय सँडविच

आजचा विषय सँडविच

सँडविच म्हणजे आपल्या खाण्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ. वडापाव इतकंच सँडविच हे सर्वांना आवडतं. पण पहिलं सँडविच नेमकं कोणी तयार केलं, त्याचा जनक कोण हे मात्र आपल्याला ठाऊक नसेल. व्हेज असो की चिकन सँडविच सर्वसामान्य माणसांचं पोट भरणाऱ्या या सँडविचचा शोध इंग्लंडच्या एका राजाने लावल्याचं सांगितलं, तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही! पण अनेक शोधांपैकी हा शोधही अतिशय अपघातानेच लागला. इंग्लंडमधल्या सँडविच संस्थानचा अर्ल म्हणजे म्हणजे राजा ज्याचं नाव जॉन माँटेग्यू होतं, त्याने अठराव्या शतकात हा खाद्यपदार्थ लोकप्रिय केला. माँटेग्यूला जुगाराचं व्यसन होतं. एकदा पत्ते खेळायला बसलं की तासन् तास नव्हे, तर कधी कधी संपूर्ण रात्र तो पत्त्यांच्याच गराड्यात पडलेला असे. अशावेळी त्याला तहानभूक कशाचीही आठवण राहत नसे. अशाच एका रात्री माँटेग्यूचा डाव रंगला होता. दुसरीकडे त्याच्या महालातील नोकर राजाला काहीतरी खायला द्यावं, पण डाव न मोडता कसं द्यावं याच्या विचारात होते. खेळात अतिशय गुंग झालेल्या माँटेग्यूने मग चिकन मागवलं. नोकरांनी ते तत्काळ हजरही केलं. पण चिकनचे तुकडे खायचे कसे या विचारात तो पडला. इंग्लंड म्हणजे शिष्टाचारी राजघराणी. खाण्याचे रितीरिवाज न सोडता पोटही भरायचं आणि पत्तेही खेळत राहायचं, असा प्रश्न राजासमोर उभा राहिला. अखेर माँटेग्यूने आपल्या नोकराला फर्मान सोडलं. हे चिकनचे तुकडे ब्रेडच्या दोन तुकड्यांत घालून आण, नोकराने तत्काळ तसं केलं. महालातील सर्वजण आश्चर्यचकित होऊन राजाकडे पाहात राहिले. दोन ब्रेडमध्ये धरलेले चिकनचे तुकडे माँटेग्यूने खाल्ले आणि सर्वांना एक वेगळाच अनुभव मिळाला. मग इतरांनीही नोकरांकडे the same as sandwich अशी मागणी केली. त्यावरूनच दोन ब्रेडमध्ये दुसरा पदार्थ घालून खाण्याला सँडविच म्हटलं जाऊ लागलं. १८ व्या शतकात राजाने केलेल्या एका छोट्याशा कृतीचं रूपांतर एका नव्या खाद्यपदार्थाच्या शोधात झालं. इंग्लंडने जगाला दिलेली ही आगळीवेगळी देणगीच आहे
फ्रेंच बिन्स सॅण्डविच (एमरल्ड सॅण्डविच)
साहित्य - ४-६ ब्राउन ब्रेडचे स्लाईस, १ वाटी फ्रेंच बिन्स, १ चमचा आलं मिरची रगडून, प्रत्येकी १ चमचा जिरे पावडर आणि गरम मसाला, मीठ, १ चमचा तेल, कोथिंबीर, बटर, १ चमचा साय, १-२ चमचे तांदूळ पिठी.
कृती - निवडून घेतलेल्या फ्रेंच बिन्स बारीक चिरून घ्याव्यात. एक चमचा तेल गरम करून त्यात फ्रेंच बिन्स परतायला टाकाव्यात. मीठ घालून झाकण ठेवावं. थोडी वाफ आली की त्यात साय घालून ढवळावं. मिश्रण कोरडं झालं की गॅस बंद करावा. दोन ब्रेडस्लाईसच्या मध्ये तयार भाजी भरून ब्रेडच्या बाहेरच्या बाजूला बटर लावून टोस्टरवर किंवा तव्यावर सॅण्डविच दोन्ही बाजूंनी टोस्ट करून घ्यावं.
रवा मलई सॅंडविच
साहित्य : ४-५ स्लाइस ब्रेड , ५-६ चमचे बारीक रवा , आधा कप मलई (फ्रेश क्रीम) , अर्धा चमाचा जीरे,एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,पाव चमचा लाल तिखट, बचकभार बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,सॅंडविचला लावण्यासाठी आमुळ बटर.
कृती : सॅंडविचचे टॉपिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये रवा,मलई (फ्रेश क्रीम),बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेला टोमॅटो,बारीक चिरलेली हिरवी मिरची,जिरे,लाल मिरचीचे तिखट,चिरलेली कोथिंबीर,आणि चवीनुसार मीठ घालून सगळे घटक पदार्थ ढवळून घेऊन चांगले मिक्स करून घ्या.
आता सॅंडविच बनवण्यासाठी ब्रेडचा एक स्लाइस घेऊन त्याच्या एका बाजूला दोन चमचे टॉपिंगचे मिश्रण लावा.अशाच प्रकारे ब्रेडच्या उरलेल्या सगळ्या स्लाईसेसना सुद्धा टॉपिंगचे मिश्रण लावून ठेवा.
आता गॅसवर एक नॉन-स्टिक तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्याला अमूलचे बटर लावा. गरम तव्यावर ब्रेड स्लाइस टाकून माध्यम आंचेवर बटर लावून एक मिनिट भाजा. त्यानंतर कलथ्याच्या मदतीने खूप काळजीपूर्वक स्लाइस पलटी करा आणि दुसर्यान बाजूने बटर लावून भाजून घ्या.
स्प्राऊट सॅंडविच
साहित्य : सहा नग ब्राऊन ब्रेडचे (गव्हाचा पाव) स्लाइस,एक वाटी मोड आणून वाफवलेले मूग,हरभरे,सोयाबीन ई. ,दोन उकडलेले बटाटे, दोन कांद्याच्या गोल कापलेल्या चकत्या , टोमॅटोच्या गोल कापलेल्या चकत्या,दोन बारीक चिरलेले कांदे,दोन बारीक चिरलेले टोमॅटो,दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,एक चमचा आले-लसणाची पेस्ट,एक चमचा प्रत्येकी धने-जिरे पावडर, एक छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी अमूलचे बटर.
कृती : गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये अमूल बटर गरम करा. त्यात प्रथम कांदा परतून घ्या,मग आले-लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची ,धने-जिरे पूड,हळद,चाट मसाला व काली मिरे पूड घालून परता. आता बारीक चिरलेले टोमॅटो,चवीनुसार मीठ,मोड आणून वाफावलेली मूग,हरभरा व सोयाबीन ई. व मॅश करून उकडलेले बटाटे घालून उलथण्याने ढवळून चांगले मिक्स करून घ्या व मंद आंचेवर ४-५ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा.
आता एकेक ब्राऊन ब्रेड स्लाइस घेऊन त्यास सुरीने अमूलचे बटर लावून घ्या व त्यावर प्रथम मोड आणून वाफावलेले स्पाऊटस् पसरा ,मग त्यावर कांदा व टोमॅटोचे काप ठेवा. दुसर्याो स्लाइसळा अमूल बटर लावून तो वर पालथा ठेवा. आशा रीतीने स्प्राऊटस् व कांदा-टोमॅटोचे काप यांचे मिश्रण ठेवलेले स्लाइस तयार करा. हे स्लाइस आता टोस्टर मध्ये ठेऊन भाजून घ्या किंववा ग्रिल करून घ्या.
गरमागरम स्प्रा्उट्स सॅंडविच टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
कर्ड सॅण्डवीच
साहित्य : १ सॅण्डवीच ब्रेड, २ कप ताजं दही, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, पाव बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ इंच बारीक चिरलेलं आलं, २ कढीपत्त्याची पानं, ३ चमचे साखर, मोहरी, आवश्यकतेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम दही पातळ कपडय़ात ३ ते ४ तास बांधून ठेवावं. मग एका बाऊलमधे काढून त्यात साखर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. ब्रेडची एक स्लाईस घेऊन त्यावर दोन चमचे दह्याचे मिश्रण टाकून ब्रेडवर ते सगळीकडे पसरावं व त्यावर ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड तयार करून घ्यावेत. एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालावं. त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकून नंतर तयार केलेली ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवून ती दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड भाजून घ्यावेत. ब्रेड त्रिकोणी कापून ते हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खावेत.
रेनबो सॅण्डविच
साहित्य – ६ ते ८ ब्राउन ब्रेडचे स्लाइस, प्रत्येकी १ वाटी जाड किसलेलं गाजर आणि पत्ताकोबी, अर्धी वाटी चक्का, दोन, तीन कमी तिखट अगदी बारीक चिरलेल्या मिरच्या, १ चमचा बारीक चिरलेला लसूण, १ चमचा इटालिअन हर्बज, १ चमचा पिझा मसाला, मीठ, बटर, लोणी, १ किसलेला चिज क्यूब.
कृती - चक्का काटय़ानं थोडा फेटून घ्यावा. त्यात चिज, मिरची, लसूण, इटालिअन हर्बज, पिझा मसाला आणि मीठ घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. त्यात सगळ्या भाज्या घालून मिश्रण एकजीव करावं. ब्रेडस्लाइसला एका बाजूला बटर लावावं. दुस:या बाजूवर सारण पसरवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवावी. वरून बटर लावून सॅण्डविच टोस्टरमध्ये किंवा तव्यावर टोस्ट करून घ्यावं. तव्यावर टोस्ट करताना त्यावर एखादी जड काचेची प्लेट ठेवली तर सॅण्डविच छान भाजली जातात.
मका सॅण्डविच
साहित्य : १ कप वाफवलेले मक्याचे दाणे, २ चमचे बारीक चिरलेला कांदा, १ चमचा बटर,
२ (बारिक चिरुन) हिरवी मिरची, सिमला मिरची अर्धा वाटी (बारीक चिरून), मीठ : स्वादानुसार
दीड वाटी व्हाइट सॉस, चीज गरजेनुसार ,६ ब्रेड स्लाइस.
व्हाइट सॉस:- व्हाइट सॉस नेहमी मैदा वापरून तयार केला जातो. पण त्याऐवजी कणीक वापरून तयार केल्यास अधिक चविष्ट आणि पौष्टिक होतो.
कृती : जाड बुडाच्या कढईत २ मोठे चमचे बटर घाला. त्यात २ मोठे चमचे कणीक घाला. हलकं भाजून घ्या. रंग बदलून देऊ नका. गॅस बंद करून त्यात दीड कप दूध घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. मग मंद आचेवर शिजवा. त्यात मिरी पावडर आणि मीठ घाला. गॅस बंद करा.
कृती :- कढईत बटर घाला. त्यात कांदा घालून परता. रंग बदलू देऊ नका. मग त्यात हिरवी मिरची घाला. वाफवलेले कॉर्न दाणे घालून मिक्स करा. सिमला मिरची घालून परतून घ्या. गरजेनुसार चीज घाला. गॅस बंद करून त्यामध्ये व्हाइट सॉस घालून मिक्स करा. ब्रेड स्लाइसला हे तयार मिश्रण लावून त्यावर दुसरा स्लाइस ठेवा. तव्यावर सॅंडविच खमंग भाजून घ्या. दोन्ही बाजू कट करून सॉससह सर्व करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

सँडविच म्हणजे आपल्या खाण्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ. वडापाव इतकंच सँडविच हे सर्वांना आवडतं. पण पहिलं सँडविच नेमकं कोणी तयार केलं, त्याचा जनक कोण हे मात्र आपल्याला ठाऊक नसेल. व्हेज असो की चिकन सँडविच सर्वसामान्य माणसांचं पोट भरणाऱ्या या सँडविचचा शोध इंग्लंडच्या एका राजाने लावल्याचं सांगितलं, तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही! पण अनेक शोधांपैकी हा शोधही अतिशय अपघातानेच लागला. इंग्लंडमधल्या सँडविच संस्थानचा अर्ल म्हणजे म्हणजे राजा ज्याचं नाव जॉन माँटेग्यू होतं, त्याने अठराव्या शतकात हा खाद्यपदार्थ लोकप्रिय केला. माँटेग्यूला जुगाराचं व्यसन होतं. एकदा पत्ते खेळायला बसलं की तासन् तास नव्हे, तर कधी कधी संपूर्ण रात्र तो पत्त्यांच्याच गराड्यात पडलेला असे. अशावेळी त्याला तहानभूक कशाचीही आठवण राहत नसे. अशाच एका रात्री माँटेग्यूचा डाव रंगला होता. दुसरीकडे त्याच्या महालातील नोकर राजाला काहीतरी खायला द्यावं, पण डाव न मोडता कसं द्यावं याच्या विचारात होते. खेळात अतिशय गुंग झालेल्या माँटेग्यूने मग चिकन मागवलं. नोकरांनी ते तत्काळ हजरही केलं. पण चिकनचे तुकडे खायचे कसे या विचारात तो पडला. इंग्लंड म्हणजे शिष्टाचारी राजघराणी. खाण्याचे रितीरिवाज न सोडता पोटही भरायचं आणि पत्तेही खेळत राहायचं, असा प्रश्न राजासमोर उभा राहिला. अखेर माँटेग्यूने आपल्या नोकराला फर्मान सोडलं. हे चिकनचे तुकडे ब्रेडच्या दोन तुकड्यांत घालून आण, नोकराने तत्काळ तसं केलं. महालातील सर्वजण आश्चर्यचकित होऊन राजाकडे पाहात राहिले. दोन ब्रेडमध्ये धरलेले चिकनचे तुकडे माँटेग्यूने खाल्ले आणि सर्वांना एक वेगळाच अनुभव मिळाला. मग इतरांनीही नोकरांकडे the same as sandwich अशी मागणी केली. त्यावरूनच दोन ब्रेडमध्ये दुसरा पदार्थ घालून खाण्याला सँडविच म्हटलं जाऊ लागलं. १८ व्या शतकात राजाने केलेल्या एका छोट्याशा कृतीचं रूपांतर एका नव्या खाद्यपदार्थाच्या शोधात झालं. इंग्लंडने जगाला दिलेली ही आगळीवेगळी देणगीच आहे
फ्रेंच बिन्स सॅण्डविच (एमरल्ड सॅण्डविच)
साहित्य – ४-६ ब्राउन ब्रेडचे स्लाईस, १ वाटी फ्रेंच बिन्स, १ चमचा आलं मिरची रगडून, प्रत्येकी १ चमचा जिरे पावडर आणि गरम मसाला, मीठ, १ चमचा तेल, कोथिंबीर, बटर, १ चमचा साय, १-२ चमचे तांदूळ पिठी.
कृती – निवडून घेतलेल्या फ्रेंच बिन्स बारीक चिरून घ्याव्यात. एक चमचा तेल गरम करून त्यात फ्रेंच बिन्स परतायला टाकाव्यात. मीठ घालून झाकण ठेवावं. थोडी वाफ आली की त्यात साय घालून ढवळावं. मिश्रण कोरडं झालं की गॅस बंद करावा. दोन ब्रेडस्लाईसच्या मध्ये तयार भाजी भरून ब्रेडच्या बाहेरच्या बाजूला बटर लावून टोस्टरवर किंवा तव्यावर सॅण्डविच दोन्ही बाजूंनी टोस्ट करून घ्यावं.
रवा मलई सॅंडविच
साहित्य : ४-५ स्लाइस ब्रेड , ५-६ चमचे बारीक रवा , आधा कप मलई (फ्रेश क्रीम) , अर्धा चमाचा जीरे,एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,पाव चमचा लाल तिखट, बचकभार बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,सॅंडविचला लावण्यासाठी आमुळ बटर.
कृती : सॅंडविचचे टॉपिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये रवा,मलई (फ्रेश क्रीम),बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेला टोमॅटो,बारीक चिरलेली हिरवी मिरची,जिरे,लाल मिरचीचे तिखट,चिरलेली कोथिंबीर,आणि चवीनुसार मीठ घालून सगळे घटक पदार्थ ढवळून घेऊन चांगले मिक्स करून घ्या.
आता सॅंडविच बनवण्यासाठी ब्रेडचा एक स्लाइस घेऊन त्याच्या एका बाजूला दोन चमचे टॉपिंगचे मिश्रण लावा.अशाच प्रकारे ब्रेडच्या उरलेल्या सगळ्या स्लाईसेसना सुद्धा टॉपिंगचे मिश्रण लावून ठेवा.
आता गॅसवर एक नॉन-स्टिक तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्याला अमूलचे बटर लावा. गरम तव्यावर ब्रेड स्लाइस टाकून माध्यम आंचेवर बटर लावून एक मिनिट भाजा. त्यानंतर कलथ्याच्या मदतीने खूप काळजीपूर्वक स्लाइस पलटी करा आणि दुसर्यान बाजूने बटर लावून भाजून घ्या.
स्प्राऊट सॅंडविच
साहित्य : सहा नग ब्राऊन ब्रेडचे (गव्हाचा पाव) स्लाइस,एक वाटी मोड आणून वाफवलेले मूग,हरभरे,सोयाबीन ई. ,दोन उकडलेले बटाटे, दोन कांद्याच्या गोल कापलेल्या चकत्या , टोमॅटोच्या गोल कापलेल्या चकत्या,दोन बारीक चिरलेले कांदे,दोन बारीक चिरलेले टोमॅटो,दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,एक चमचा आले-लसणाची पेस्ट,एक चमचा प्रत्येकी धने-जिरे पावडर, एक छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी अमूलचे बटर.
कृती : गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये अमूल बटर गरम करा. त्यात प्रथम कांदा परतून घ्या,मग आले-लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची ,धने-जिरे पूड,हळद,चाट मसाला व काली मिरे पूड घालून परता. आता बारीक चिरलेले टोमॅटो,चवीनुसार मीठ,मोड आणून वाफावलेली मूग,हरभरा व सोयाबीन ई. व मॅश करून उकडलेले बटाटे घालून उलथण्याने ढवळून चांगले मिक्स करून घ्या व मंद आंचेवर ४-५ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा.
आता एकेक ब्राऊन ब्रेड स्लाइस घेऊन त्यास सुरीने अमूलचे बटर लावून घ्या व त्यावर प्रथम मोड आणून वाफावलेले स्पाऊटस् पसरा ,मग त्यावर कांदा व टोमॅटोचे काप ठेवा. दुसर्याो स्लाइसळा अमूल बटर लावून तो वर पालथा ठेवा. आशा रीतीने स्प्राऊटस् व कांदा-टोमॅटोचे काप यांचे मिश्रण ठेवलेले स्लाइस तयार करा. हे स्लाइस आता टोस्टर मध्ये ठेऊन भाजून घ्या किंववा ग्रिल करून घ्या.
गरमागरम स्प्रा्उट्स सॅंडविच टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
कर्ड सॅण्डवीच
साहित्य : १ सॅण्डवीच ब्रेड, २ कप ताजं दही, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, पाव बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ इंच बारीक चिरलेलं आलं, २ कढीपत्त्याची पानं, ३ चमचे साखर, मोहरी, आवश्यकतेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम दही पातळ कपडय़ात ३ ते ४ तास बांधून ठेवावं. मग एका बाऊलमधे काढून त्यात साखर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. ब्रेडची एक स्लाईस घेऊन त्यावर दोन चमचे दह्याचे मिश्रण टाकून ब्रेडवर ते सगळीकडे पसरावं व त्यावर ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड तयार करून घ्यावेत. एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालावं. त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकून नंतर तयार केलेली ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवून ती दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड भाजून घ्यावेत. ब्रेड त्रिकोणी कापून ते हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खावेत.
रेनबो सॅण्डविच
साहित्य – ६ ते ८ ब्राउन ब्रेडचे स्लाइस, प्रत्येकी १ वाटी जाड किसलेलं गाजर आणि पत्ताकोबी, अर्धी वाटी चक्का, दोन, तीन कमी तिखट अगदी बारीक चिरलेल्या मिरच्या, १ चमचा बारीक चिरलेला लसूण, १ चमचा इटालिअन हर्बज, १ चमचा पिझा मसाला, मीठ, बटर, लोणी, १ किसलेला चिज क्यूब.
कृती – चक्का काटय़ानं थोडा फेटून घ्यावा. त्यात चिज, मिरची, लसूण, इटालिअन हर्बज, पिझा मसाला आणि मीठ घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. त्यात सगळ्या भाज्या घालून मिश्रण एकजीव करावं. ब्रेडस्लाइसला एका बाजूला बटर लावावं. दुस:या बाजूवर सारण पसरवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवावी. वरून बटर लावून सॅण्डविच टोस्टरमध्ये किंवा तव्यावर टोस्ट करून घ्यावं. तव्यावर टोस्ट करताना त्यावर एखादी जड काचेची प्लेट ठेवली तर सॅण्डविच छान भाजली जातात.

Author