लालचुटूक लीचीचा हंगाम सुरू झाला आहे. कोलकात्याहून पुण्यातील मार्केटयार्डातील घाऊक फळबाजारात लीचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक पाण्यासोबतच आहारात फळभाज्या, फळांचाही योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचे आहे. कलिंगड, टरबूज, ताडगोळा, शहाळ्याचं पाणी यासोबतच लीची खाणंही आरोग्यवर्धक आहे. लीची हे पाणीदार फळ आहे. सोबतच त्याला एक मंद सुगंध असल्याने उन्हाळ्यात लीची खाणं आरोग्यवर्धक आहे. अतिशय मधुर, रसाळ. उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारे फळ. हे देखील फळ मूळचे दक्षिण चीनमधले. बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर व अर्धपारदर्शी. हे फळ अत्यंत चवदार, थोडे आंबट-गोड असते. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा खाण्याची इच्छा होते. मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यान लीची बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. लीचीची फळे आंबटगोड आणि मधुर स्वादाची असतात. लीचीच्या फळांचा आकर्षक लाल रंग आणि मधुर स्वाद यामुळे लीचीची फळे जगभर प्रसिद्ध आहेत. लीचीची फळे साधारणपणे द्राक्ष, आंबा आणि स्ट्रॉबेरी यांचा हंगामा संपत आल्यानंतर होतात. त्यामुळे लीचीच्या फळांना बाजारात चांगली मागणी असते. भारतात बिहार व पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लागवड केली जाते. महाराष्ट्रात ठाणे, महाबळेश्वर, माथेरान या भागात लीचीची लागवड होते असली तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात लीचीच्या लागवडीस भरपूर वाव आहे. या देशांशिवाय जगात लीचीची लागवड म्यानमार, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, ब्राझील, व्हिएतनाम, इंडोनेशिया, वेस्ट इंडिजबेटे, मॉरिशस इत्यादी देशांमध्ये केली जाते. उत्पादनापैकी १.५२ लाख टन उत्पादन फक्त भारत आणि चीन या दोन देशांत होते. भारत आणि चीन हे लीची उत्पादनातील प्रमुख देश असून जगाच्या एकूण उत्पादनाच्या ६३% उत्पादन या दोन्ही देशांमध्ये होते. भारतात लीचीच्या जवळपास ५० जाती उपलब्ध आहेत. भारतामध्ये लीचीची सर्वांत जास्त लागवड बिहार राज्यात केली जाते. बिहार राज्यात लीचीच्या मुझफ्फरपूर, शाही, कसबा, चिनी, देशी आणि पूरबी या प्रमुख जातींची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने लीचीच्या स्थानिक जातींची लागवड केली जाते.
लीची या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. लीचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लीचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो.
उन्हाळ्याच्या दिवसात थकवा येतो. अशावेळेस लीचीच्या सेवनामुळे त्यामधील नियासिन घटक शरीरातील हिमोग्लोबिन घटक निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते.
लीचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्युमर यांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. सोबतच लीची मधील फ्लेवोनॉईड्स आणि अॅनन्टीऑक्सिडंट घटक कॅन्सरचा बचाव करण्यास मदत करतात.
वजन घटवणार्यांकसाठी लीची हे फळं फायदेशीर ठरतं. कपभर लीचीच्या अर्कामध्ये १२५ कॅलरीज असतात. यामध्ये फॅट्स कमी असतात. फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम घटक लीचीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कपभर लीचीमध्ये ३२५ ग्राम पोटॅशियम घटक आढळतात. यामुळे दिवसभरातील 9% गरज पूर्ण होण्यास मदत होते.
शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लीची हे फळ मदत करते. कपभर लीचीमध्ये सुमारे 136 मिली ग्राम व्हिटॅमिन सी घटक आढळतात. नियमित लीचीच्या सेवनामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
चेहर्यातवर पिंपल्सचे डाग असतील त्वचा खुलवण्यासाठी लीची खाणं आरोग्यदायी ठरते. लीचीमध्ये अॅ न्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अॅरन्टी एजिंगचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.
लीचीच्या पक्क फळांपासून डेसर्टस, ज्यूस, आईसक्रीम लोणचे, सरबत, स्व्कॅश, वाईन यासारखे विविध टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. लीचीची फळे डबाबंद करून तसेच वाळवून (लीची नट) जास्त टिकविता येतात. लीचीच्या बी पासून बनवलेलाचहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो.
लीचीपासून बनविलेले काही पदार्थ.
साबुदाणा लीची पुडिंग
साहित्य. अर्धी वाटी साबुदाणा, अर्धा कप साखर, एक लिटर घट्ट दूध, 5-6 लीची बिया काढून, दोन चमचे बदामाचे काप (भाजून), अर्धा चमचा वेलचीपूड.
कृती. साबुदाणा धुऊन भिजवत ठेवावा. लीची साखरेत शिजवून घ्यावी व गार करावी. दूध आटवत ठेवावे. त्यातच साबुदाणा घालून घट्ट खीर बनवावी व गार करावी. आता त्यात लीची घालावी व वेलचीपूडही घालावी. हे मिश्रण बाऊलमध्ये सेट करायला ठेवावे. वरून भाजलेले बदामाचे काप घालून सजवावे.
लीची ऑरेंज लेमोनेड
साहित्य. ४५ मिली संत्र्याचे सिरप, ४५ मिली लीची सिरप, ४५ मिली लिंबू रस, १८५ मिली सोडा, संत्र्याच्या फोडी आणि सजावटीसाठी पुदिना.
कृती. संत्रे आणि लीची सिरप एका लांबट ग्लासमध्ये ओता. त्यात बर्फ भरून घ्या. यामध्ये लिंबाचा रस आणि सोडा घालून ढवळा. संत्र्याच्या फोडी आणि पुदिन्याची पाने घेऊन सजावट करा.
लीची रोस्टेड बदाम स्मूदी
साहित्य. लीची ८ नग, दही ३ चमचे, फ्रेश क्रीम २ चमचे, दूध- १ ग्लास, व्हॅनिला आइस्क्रीम- ३ चमचे, साखर ३/४ चमचे, रोस्टेड बदाम ५/६.
कृती. मिक्सरच्या भांडय़ात लीची टाका. त्यामध्ये तीन चमचे दही, फ्रेश क्रीम, दूध, व्हॅनिला आइस्क्रीम व साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता त्यामध्ये रोस्टेड बदामचे स्लाइस करून टाका. असल्यास २/३ थेंब लीची इसेंस टाका. नंतर हे मिश्रण ग्लासमध्ये ओतून सव्र्ह करा.
पुढील साईट्सवर आपल्याला लीची या फळाची अधिक माहिती मिळेल.
www.lycheesonline.com
www.crfg.org/pubs/ff/lychee.html
www.lychee.com/lychee.html
www.lycheesonline.com/recipes.cfm
www.importfood.com/infolychee.html
www.growtropicalfruit.com/recipes.php
www.melissas.com/recipes/index.cfm?Recipe_ID=907
www.worldcraftsvillage.com/06recipes.pdf
http://www.thefruitpages.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आजचा विषय लीची