आजचा विषय पपनस

आजचा विषय पपनस

पपनस हे संत्रं, मोसंबी अशा सायट्रस वर्गातील फळ असून ते प्रामुख्याने आशियात आढळतं. आशिया इतकं जगाच्या अन्य कोणत्याही भागात ते प्रचलित नाही. इंग्रजीत पोमेलो तर हिंदी आणि मराठीत पपनस या नावाने प्रचलित आहे.
आतील गर हा अतिशय उपयुक्त असून, तो रंगांने गुलाबी असतो तर पपनसाची साल बाहेरून हिरवी किंवा पिवळ्या रंगांची असते. त्याचा आतला गर हा पांढरा किंवा पातळ असेल तर तो खाण्यास अयोग्य असतो. पपनसाला 'चकुत्र' 'बंपर', 'फोफनीस' आणि 'चकोत्रा' अशा स्थानिक नावानी ओळखले जाते. फळ कच्चे असेल तर गर बराच कडवट लागतो. फळ पिकल्यावर हा कडवटपणा कमी होतो. बियांपासून रोपे तयार करता येतात. महाराष्ट्रातील कोकणात विशेषत: ही झाडे जास्त प्रमाणात आहेत. प्रामुख्याने आशियात आढळतं. जगाच्या इतर भागात हे तितकसं प्रचलित नाही. फळे पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते. फळ सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत आवरण असते. ते सोलल्यावर आत मोसंब्याप्रमाणे फोडींची रचना असते. पांढरा गर किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगाचा गर असलेल्या पपनसाच्या दोन जाती आहेत. पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. पपनसाचा मगज पौष्टीक तसाच ज्वरनाशी आहे. पपनसाचा मगज साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम,कॅल्शियम आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यापासून मुरंबे,मार्मालेड असे पदार्थ बनवतात. पपनस मध्ये त्यात भरपूर प्रमाणात पोषणतत्त्वं आहेत, ज्यात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्व सी आणि बी-६, पोटॅशियम, पाचक फायबर, मॅग्नेशियम आदी गोष्टींचा भरणा आहे. पपनसाच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. याचे लाकूड थोडेसे कठीण असते, त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करतात. गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे.
पपनसाचे काही फायदे.
» अँटिअॅीक्सिडंट म्हणून काम करते. शरीराला हानी पोहोचवणा-या फ्री रॅडिकल्सना थोपवते आणि पांढ-या पेशींची वाढ करते.
» सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या विषाणूंपासून संरक्षण करते.
» पचनशक्ती सुधारते.
» प्रत्येक पपनसमध्ये पोटॅशियमचं प्रमाण ३७ टक्के असतं. त्यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहातं. त्यामुळे हार्टअॅतटॅकसारख्या आजारापासून बचाव करतं.
» स्नायूंमध्ये येणारे क्रॅम्प रोखण्याचं काम करतं.
» हाडं मजबूत होतात. त्यामुळे ऑस्टिओपोरायसिससारख्या आजारापासून संरक्षण होतं.
» काळानुसार त्वचेवर येणा-या सुरकुत्या थांबवण्याचं काम पपनस करतं. याबरोबरच पिंपल्स, अॅमक्नेसारख्या विकारांवर मात करून त्वचेचा पोत सुधारतो.
» वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.
» तोंडातील किटाणू नष्ट करून दात, हिरडया यांचं आरोग्य सुधारतं.
» किडणी रुग्णांनी किंवा कमी-उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे फळ खाऊ नये.
» रक्ताभिसरण सुधारते. स्त्रियांची मासिक पाळीदरम्यान झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यात मदत करते.
» संत्र्याप्रमाणे याच्या सालीचा उपयोग होत असून त्यात बायोफ्लेवोनाइट्स असल्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयोग होतो.
» याच्या नियमित सेवनाने लघवी स्वच्छ होते.
» केसातील कोंडा नष्ट होतो, केस गळण्याची समस्याही काही प्रमाणात दूर होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

पपनस हे संत्रं, मोसंबी अशा सायट्रस वर्गातील फळ असून ते प्रामुख्याने आशियात आढळतं. आशिया इतकं जगाच्या अन्य कोणत्याही भागात ते प्रचलित नाही. इंग्रजीत पोमेलो तर हिंदी आणि मराठीत पपनस या नावाने प्रचलित आहे.
आतील गर हा अतिशय उपयुक्त असून, तो रंगांने गुलाबी असतो तर पपनसाची साल बाहेरून हिरवी किंवा पिवळ्या रंगांची असते. त्याचा आतला गर हा पांढरा किंवा पातळ असेल तर तो खाण्यास अयोग्य असतो. पपनसाला ‘चकुत्र’ ‘बंपर’, ‘फोफनीस’ आणि ‘चकोत्रा’ अशा स्थानिक नावानी ओळखले जाते. फळ कच्चे असेल तर गर बराच कडवट लागतो. फळ पिकल्यावर हा कडवटपणा कमी होतो. बियांपासून रोपे तयार करता येतात. महाराष्ट्रातील कोकणात विशेषत: ही झाडे जास्त प्रमाणात आहेत. प्रामुख्याने आशियात आढळतं. जगाच्या इतर भागात हे तितकसं प्रचलित नाही. फळे पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते. फळ सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत आवरण असते. ते सोलल्यावर आत मोसंब्याप्रमाणे फोडींची रचना असते. पांढरा गर किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगाचा गर असलेल्या पपनसाच्या दोन जाती आहेत. पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. पपनसाचा मगज पौष्टीक तसाच ज्वरनाशी आहे. पपनसाचा मगज साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम,कॅल्शियम आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यापासून मुरंबे,मार्मालेड असे पदार्थ बनवतात. पपनस मध्ये त्यात भरपूर प्रमाणात पोषणतत्त्वं आहेत, ज्यात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्व सी आणि बी-६, पोटॅशियम, पाचक फायबर, मॅग्नेशियम आदी गोष्टींचा भरणा आहे. पपनसाच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. याचे लाकूड थोडेसे कठीण असते, त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करतात. गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे.

Author