साहित्य:- एक लिटर दूध, चार वाट्या साखर, दोन वाट्या सीताफळाचा गर, चिमूटभर केशर, आवडत असल्यास चिरलेले ड्रायफ्रूट्स.
कृती – जाड बुडाच्या भांड्यामध्ये दूध आटवत ठेवावं. अंदाजे निम्मे झालं, की त्यात साखर घालावी. साखर विरघळली, की केशर घालावं. गॅस बंद करून गार होऊ द्यावं. त्यात सीताफळाचा गर मिसळून अलगद ढवळावं. फ्रिजरमध्ये ठेवून थंडगार झाल्यावर सर्व्ह करावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Author
Post Views: 11