चवळी उसळ

चवळी उसळ करण्याआधी आठ- दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे.



p-1870-chavli-usal
p-1870-chavli-usal

साहित्य:- भिजलेल्या दोन वाटी चवळ्या, एक चमचा जिरे, चार चमचे सुके खोबरे व दोन-तीन सुक्या लाल मिरच्या, चार-पाच अमसुले, दीड चमचा घाटी मसाला, चवीनुसार मीठ, चार चमचे तेल, फोडणी-नेहमीचीच ( मोहरी+हिंग+हळद व लाल तिखट-आवडीनुसार ), कोथिंबीर बारीक चिरून.

कृती:- चवळी उसळ करण्याआधी आठ- दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे. दोन भांडी पाणी घालून झाकून मध्यम आचेवर दहा मिनिटे शिजू द्यावे. एकीकडे खोबरे, जिरे व सुक्या मिरच्या भाजून वाटून घ्याव्यात. चांगली वाफ आली की झाकण काढून त्यात हा वाटलेला मसाला, लाल तिखट व अर्धी कोथिंबीर घालून पुन्हा पाच-सहा मिनिटे शिजू द्यावे. आता चवळ्या बोटचेप्या झाल्या असतील. त्यात चवीनुसार मीठ, आमसुले व घाटी मसाला व एक भांडे पाणी घालून एक सणसणीत उकळी आणून आचेवरून उतरवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरम गरम वाढावी.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →