देऊळगावराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरातील जुने बालाजी मंदिर प्रेक्षणीय असून, महाराष्ट्राचे तिरुपती अशी या मंदिराची ख्याती आहे. राजे जगदेवराव जाधव यांनी या मंदिराची उभारणी केली. राजे जगदेवराव हे शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे वडील लखोजीराव जाधव यांच्या घराण्याच्या चौथ्या पिढीतील वारस होत.
Author
Post Views: 9