गडचिरोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे.



जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे. तांदूळ हे येथील प्रमुख शेती-उत्पन्न आहे तर ज्वारी, तेलबिया, तुर, गहू ही पीके देखील घेतली जातात. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा व धानोरा हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
जिल्हा बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर ऊस, तंबाखू व शिंगाड्याचे उत्पादनही जिल्ह्यात घेतले जाते. आंबा, सीताफळ, काजू, पेरू, जांभूळ ही फळेही जिल्ह्यात काही प्रमाणात पिकवली जातात. आरमोरी, कुरखेडा व कोरची भागात प्रामुख्याने आंबा घेतला जातो.

Author