मराठी संगीत रंगभूमीवर स्वतःची विशेष छाप पाडणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांच्या जाण्याने पारंपरिक संगीत रंगभूमी आणि नव्या विचार-आशयांची संगीत रंगभूमी यांना जोडणारा दुवा निखळला आहे. २०१२ साली महाराष्ट्र राज्य शासनाने संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला होता. त्यावेळी त्यांच्या गौरवपर सादर झालेल्या चित्रफितीद्वारे त्यांच्या कार्याला वंदन करूया.