रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – २

दाजी पणशीकर… ज्येष्ठ विचारवंत, रामायण, महाभारत, संतवांग्मय यांचे अभ्यासक, परखड विचार मांडणारे व्याख्याते आणि ग्रंथ लेखक ही त्यांची ओळख आहे पण दाजी पणशीकर यांनी आपले मोठे बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेचे सूत्रधार म्हणून बावीस वर्षे व्यवस्थापन केले, हे काही जणांना माहीत नसेल.



दाजी पणशीकर… ज्येष्ठ विचारवंत, रामायण, महाभारत, संतवांग्मय यांचे अभ्यासक, परखड विचार मांडणारे व्याख्याते आणि ग्रंथ लेखक ही त्यांची ओळख आहे पण दाजी पणशीकर यांनी आपले मोठे बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेचे सूत्रधार म्हणून बावीस वर्षे व्यवस्थापन केले, हे काही जणांना माहीत नसेल. या प्रदीर्घ कालावधीत मराठी रंगभूमीच्या क्षेत्रातले अनेक प्रतिभासंपन्न नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, संस्थाचालक त्यांच्या संपर्कात आले. दाजींना जाणवलेले त्यांचे वेगळेपण आणि त्यांचे नाट्यसृष्टीतले योगदान याविषयी या व्याख्यानमालेत ते बोलणार आहेत . मराठी रंगभूमीवर शंभर वर्षाहून दीर्घ परंपरा असलेली एकमेव नाट्यसंस्था म्हणजे ‘ललितकलादर्श’.

या संस्थेचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण याविषयी सांगत आहेत, दाजी पणशीकर….