भारतीय स्वातंत्र्यलढयातल्या क्रांतीच्या तिसऱ्या पर्वाचे बिनीचे शिलेदार होते सूर्यसेन….या पर्वात सर्वात दुर्घर्ष रणधुमाळी माजली 18 एप्रिल 1930 रोजी! सूर्यसेन यांनी चटगाव चक्क स्वतंत्र करून सोडलं! दुसरं महायुद्ध पेटलं! गुलाम भारताला स्वतंत्र होण्याची दुसरी संधी आली. साधारण माणूस विश्वासून होता केवळ एक व्यक्तीवर जिनं काँग्रेसचं अध्यक्षपद लाथाडून नवं दल उभारलं होतं – नाव – सुभाषचंद्र बोस! या दोघांच्या क्रांतिकार्याचा आढावा आजच्या भागात घेऊया.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.