बागा जतीन, जलीयनवाला बाग रणांगणात, युद्धाच्या पवित्र्यात पाय रोवून उभं ठाकणं हे क्रांतीचं दुसरं पर्व ‘गदर’द्वाराच सुरू व्हायला हवं होतं, पण ते सुरू झालं गदरनंतर ओरिसात ! जुलमी राजसत्तेला डिवचून भूमिगत होण्याऐवजी मुखोमुखी लढा देण्याची सुरुवात केली – बाघा जतीन ऊर्फ जतीन्द्रनाथ मुखोपाध्याय यांन ! बाघा जतीन यांनी ब्रिटीश सैन्यांशी हातघाईची लढाईच लढली. प्रत्येक गोळीला गोळीनं प्रत्युतर देणारी ही लढाई आणि हजारो निशस्त्र निरपराधांवर बेछूट गोळीबार करून घडवलेलं जलियानवाला बाग हत्याकांड याची माहिती घेऊया या भागात.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.