छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे तो शौर्याचा, पराक्रमाचा आणि देशप्रेमाचा. देव, देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱया शूरवीरांची ही भूमी. या भूमीत जन्माला आलेल्या अनेक वीरांनी १८५७च्या ही आधी जुलमी ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र लढे दिले होते. त्यापैकीच क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे, फाशीची सजा झालेले पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक आणि आद्य क्रांतिकारक राघोजी रामोजी भांगरे यांची क्रांतिकहाणी ऐकुया या भागात.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडीएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.