फिलिपाईन्स

फिलिपाईन्स  हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.



फिलिपाईन्स

फिलिपाईन्स (अधिकृत नाव: फिलिपिन्साचे प्रजासत्ताक ; अन्य लेखनभेद: फिलिपिन्स, फिलिपाइन्स ; फिलिपिनो: Pilipinas ; स्पॅनिश: Filipinas ; इंग्लिश: Philippines 😉 हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :मनिला, क्वेझोन सिटी
अधिकृत भाषा :फिलिपिनो (टागालोग), इंग्लिश, स्पॅनिश
राष्ट्रीय चलन :फिलिपाईन पेसो

फिलिपाईन्स हे आशिया खंडातील पॅसिफिक महासागरातील द्विपप्रजासत्ताक राष्ट्र आहे. याचे क्षेत्रफळ ३,००,००० चौरस किलो मीटर आहे. येथील लोकसंख्या साधारण ८ कोटीच्या जवळपास आहे. या द्विपसमुहात ७,१०० बेटांचा समावेश आहे. ४ अंश २५ उत्तर ते २१ अंश २० उत्तर अक्षांश ११६ अंश ५५ पूर्व ते १२६ अंश ४० पूर्व रेखांशात याचा विस्तार झालेला आहे. या देशाच्या पूर्वेला फिलिपीन्स समुद्र, दक्षिणेला सेलेबीझ समुद्र, पश्चिमेस आणि उत्तरेस चिनी समुद्र असलेली ही बेटे आहेत. दक्षिणोत्तर १८५५ कि.मी तर पूर्वपश्चिम १,१०८ कि. मी. परिसरात पसरलेली ही बेटे आहेत. २.५ कि. मी.पेक्षा आकाराने जास्त असलेली फक्त ४६२ बेटे आहेत. या सर्व बेटांचे मिळून ३ प्रमुख विभाग पाडलेले आहेत. मिंदानाओ आणि लूझॉन ही दोन बेटे फिलिपीन्सचा दोन तृतीयांश भाग व्यापतात. लूझॉन बेटावरील मानिला ही या बेटांची राजधानी आहे. ही बेटे म्हणजे एकेकाळी बुडालेल्या पर्वताचा भाग आहे असे समजले जाते. ही बेटे प्रवाळद्विपांनी बनलेली आहेत.. कार्डिलेरा, सिएरा माद्रे, काराबायो ह्या येथील प्रसिद्ध पर्वत रांगा आहेत. तसेच लुझॉनच्या दक्षिण भागात मायोन हा ज्वालामुखी आहे. या बेटांवर ज्वालामुखीचे प्रमाण बरेच आढळते. नेग्रोस बेटावर कानलाओन हे २,४६० मी. उंचीचे सर्वोच्च ज्वालामुखी शिखर आहे. तर मिंदानाओ बेटावरील २,९५४ मीटर मीटर उंचीचे आपो हे देशातील सर्वात उंच शिखर आहे.

फिलिपाईन्स बेटे हा पॅसिफिक महासागरा भोवती असणाऱ्या ज्वालामुखी पट्ट्याचाच भाग असून त्यात सुमारे ५० ज्वालामुखी आहेत. त्यापैकी काही जागृत आहेत. पूलांगी, कागायान, आग्नो, पाम्पांगा, पसीग, बीकोल आणि आगूसान या येथील प्रमुख नद्या आहेत. फिलिपीन्सचे हवामान उष्ण प्रदेशिय सागरी प्रकारचे आहे. परंतु येथे प्रदेशानुसार तापमानात विविधता आहे. येथील नैसर्गिक वनसंपत्ती विपुल असून ४० टक्के क्षेत्र जंगल व्याप्त आहे.. -फिलिपीन्सचा राज्यकारभार १९७३ च्या राज्य घटनेनुसार चालतो. राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख असून कार्यकारी सत्ता पंतप्रधानांकडे असते. फिलिपीन्स हा कृषीप्रधान देश असून ५१ टक्के लोग कृषी व्यवसायात आहेत. आधुनिक शेतीने कृषी उत्पादनात वाढ झाली असल्याने कृषी उत्पादनांची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होते. उस हे नगदी पिक आणि साखर कारखान्यांचा येथे मोठा उद्योग आहे. आशियातील सर्वाधिक ख्रिस्ती लोकसंख्येचा हा देश आहे. इंग्रजी ही येथील अधिकृत भाषा आहेत. तर फिलिपीन्झ पेसो हे येथील चलन आहे.

 

Author