जॉर्डन, अधिकृत नाव जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक (किंवा जॉर्डनचे हाशेमाईट राज्य)(अरबी: المملكة الأردنية الهاشمية , अल् मामलका अल् उर्दुन्निया अल् हाशिमिया 😉 हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया, पूर्वेस इराक, उत्तरेस सीरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह-अधिकार असलेले इस्राएल व वेस्ट बँक हे देश आहेत. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे.
उन्हाळ्यात उष्ण असणार्या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.
या भागात आतापर्यंत मानवाच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने महत्त्व होते. तसेच महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व पुर्वी होते. इ स पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. या नेबॅतियन राज्याचे पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे.
इ.स. १९४६ साली जॉर्डनला ब्रिटन नेपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि राजा अब्दुल्ला (पहिला) आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.
जॉर्डनमध्ये २००३ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक होऊन लोकांनी निवडलेल्या संसदेची स्थापना झाली.
नेऋत्य आशियातील जॉर्डन या. अरब देशाचे क्षेत्रफळ ९५,५९४ चौ.कि.मी. आहे. जॉर्डनच्या उत्तरेस सिरिया, पूर्वेस इराक व सौदी अरेबिया, आग्नेय व दक्षिणेस सौदी अरेबिया आणि पश्चिमेस इस्रायल आहे. दक्षिणेला आकाबाच्या आखातावर सुमारे १९ किलोमीटरचा किनारा आहे. आकाबा हे जॉर्डनचे एकमेव बंदर आहे. जॉर्डनची राजधानी अम्मान आहे. जॉर्डनची लोकसंख्या सुमारे ५ कोटी आहे. जॉर्डनमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८९.२ टक्के आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची व भूमध्य समुद्र सान्निध्य याचा परिणाम येथील हवेवर झाला असून उंच प्रदेशात तापमान ७ ते ३१ अंश सेल्सियस असते. तर समुद्र सपाटीखाली १६ ते ३२ अंश सेल्सियस असते. जॉर्डनला साडेतीन हजार वर्षांचा इतिहास असला तरी राजकीय दृष्ट्या सध्याचे जॉर्डन दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आले. १९५२ मध्ये. झालेल्या संविधानाप्रमाणे जॉर्डन देशाचे शासन राजा, धमंडळ आणि मंत्रिमंडळ यांच्या हाती आहे. शेती, पशुपालन, खाणकाम व पर्यटन हे येथील अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत. बहुसंख्य लोक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. गहू, बार्ली, मका ही धान्ये, ‘फळफळावळ खजूर, बदाम यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. जॉर्डनमध्ये सिमेंट, ऑलिव्हतेल, सिगारेट, साबण, फर्निचर व डबाबंद भाज्या इत्यादींचे उत्पादन करणारे अनेक उद्योगही आहेत. जॉर्डनियन दिनार हे येथील चलन आहे.
अरबी ही येथील अधिकृत भाषा असून इस्लाम हा जॉर्डनचा प्रमुख धर्म आहे. राजधानी अम्मान शिवाय झार्का, इर्बीद, अल-केराक, अल-मॅफ्रॅक, मुडॅरार, माआन व अकाबा ही प्रमुख शहरे आहेत. ‘जेरूसलेम, बेथली हेम, जेरिको, नॅब्लस, हिब्रन इत्यादी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे प्रसिद्ध असून पर्यटकांचे ते मुख्य आकर्षण आहे. जॉर्डन ही नदी इस्रायल व जॉर्डन मधील प्रमुख नदी असून या नदीला काही उपनद्या येऊन मिळतात. जॉर्डनच्या खोऱ्यात गहू, तांदूळ, उस, कापूस, अंजीर व भाजीपाल्याचे उत्पादन होते. इस्रायलशी असलेल्या सततच्या वादामुळे जॉर्डनच्या सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम झालेला आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अम्मान
अधिकृत भाषा :अरबी
स्वातंत्र्य दिवस :(‘लीग ऑफ नेशन्स’पासून) मे २५, १९४६
राष्ट्रीय चलन :जॉर्डेनियन दिनार (JOD)
सौजन्य : विकिपीडिया