गिनी

गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरिया व आयव्हरी कोस्ट हे देश आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आफ्रिकेतील गिनी हा शब्द वापरणाऱ्या गिनी-बिसाउ व इक्वेटोरियल गिनी ह्या देशांपासून वेगळा ओळखला जाण्यासाठी गिनीला अनेकदा गिनी-कोनाक्री असे संबोधले जाते.



गिनी

गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरिया व आयव्हरी कोस्ट हे देश आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आफ्रिकेतील गिनी हा शब्द वापरणाऱ्या गिनी-बिसाउ व इक्वेटोरियल गिनी ह्या देशांपासून वेगळा ओळखला जाण्यासाठी गिनीला अनेकदा गिनी-कोनाक्री असे संबोधले जाते.

नायजर नदीचे उगमस्थान असलेल्या गिनीची अर्थव्यवस्था कृषी व खाण उद्योगावर अवलंबून आहे. बॉक्साइटच्या उत्पादनामध्ये गिनीचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

गिनी हा देश आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक स्वतंत्र गणतंत्र देश आहे. ८ अंश ते १५ अंश पश्चिम आणि ७ अंश ३५ ते २० अंश ३० उत्तर असा याचा विस्तार आहे. गिनीचे क्षेत्रफळ २,४५,८५७ चौ.कि.मी. इतके आहे. गिनीची लोकसंख्या १० दशलक्ष आहे. याच्या वायव्येस गिनी बिसाऊ आणि सेनेगल, पश्चिमेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस सिएरा, लिओन, आणि लाइबिरिया, आग्नेयेस आयव्हरी कोस्ट आणि उत्तरेला माली हे देश आहेत.

गिनी या देशाला अटलांटिक महासागराचा २७२ कि.मी.चा किनारा लाभला आहे. वायव्य आणि आग्नेयेला जास्तीत जास्त रुंदी असून ती ७६८ कि.मी. आहे. भौगोलिक दृष्ट्या गिनीचे चार विभाग पडतात. किनारपट्टी, त्यांच्या उत्तरेकडील फूटा जालन हा विस्तीर्ण पठारी प्रदेश, ईशान्येकडील सॅव्हानाचा गवताळ प्रदेश आणि आग्नेयेकडील वनाच्छादीत डोंगराळ भाग. दक्षिणेकडील किनारी प्रदेश सखल असून त्यावर काही नद्यांचे त्रिभूजप्रदेश आहेत. काँकूरे, नायजर, कँबीया, बाफँग, बाकोई आणि काझामास या गिनीतून वाहाणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. फूटा जालन पठारावर अनेक नद्या उगम पावतात. ईशान्येकडील गवताळ प्रदेश ३०० मी. उंचीचा असून खडकाळ डोंगर असलेला हा मैदानी प्रदेश आहे.

आग्नेयेकडील भाग. घनदाट जंगलांचा डोंगराळ आहे. निंबा हे देशातील सर्वात उंच शिखर या भागात आहे. गिनीचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचे आहे; परंतु उंचीप्रमाणे हवामानात फरक पडतो. किनारी प्रदेशात ४०० सें.मी. च्या वर तर इतरत्र २०० ते १५० सें.मी. पर्यंत पाऊस पडतो. २६ अंश ते ३० अंश से. हे तापमानाचे प्रमाण आहे. विषुववृत्तीय अरण्ये निर्माण झाल्यामुळे त्यात कठीण लाकडाचे वृक्ष, बाभूळ, निलगिरी, चिंच, बोर, एबनी, रोजवूड, शिनट इ. वृक्ष आढळतात. अरण्यात हत्ती, वाघ, सिंह, जिराफ, तरस, झेब्रा, हरीण इ. प्राणी तर नद्यांतून मगरी, सुसरी, साप आढळतात. गिनी हा मुख्यतः कृषीप्रधान देश आहे. देशातील ७५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. फुटाजालन पठाराच्या उतारावर कॉफी हे प्रमुख पिक आहे. सखल प्रदेशात केळी, अननस, ताडफळे, भात, भुईमूग, वाटाणा, तीळ, मका, ज्वारी, रताळी ही पिके होतात. अरण्यांमुळे लाकूड कामाचाही येथील लोकांचा व्यवसाय आहे. हिरे, अशुद्ध लोखंड, बॉक्साईट आणि सोने ही येथील प्रमुख खनिजे आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी आहे.

येथील अधिकृत भाषा फ्रेंच असून मुख्य धर्म ख्रिस्ती व इस्लाम आहे. सायली हे येथील प्रमुख चलन आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :कोनाक्री
अधिकृत भाषा :फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस :२ ऑक्टोबर १९५८
राष्ट्रीय चलन :गिनियन फ्रँक

( Source : Wikipedia )

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29595 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →