काँगोचे प्रजासत्ताक (काँगो)

इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही फ्रान्सची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.

p-4111-Republic of the Congo

काँगोचे प्रजासत्ताक (काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. काँगोच्या शेजारी काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबन, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक, कामेरून व अँगोला देशाचा कबिंडा हा प्रांत आहे. पश्चिमेकडे काँगोला अटलांटिक महासागराचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. काँगो नदीकाठावर वसलेले ब्राझाव्हिल ही काँगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी काँगोला अनेकदा काँगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.

इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही फ्रान्सची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.

येथील अर्थव्यवस्था शेती व खनिज तेलावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : ब्राझाव्हिल
अधिकृत भाषा : फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : १५ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून)
राष्ट्रीय चलन : मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक

( Source : Wikipedia )

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29621 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →