एस्टोनिया

एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.



एस्टोनिया
एस्टोनिया

एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.

१९९१ सालापर्यंत एस्टोनिया हे सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. तालिन ही एस्टोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

एस्टोनिया हा सोव्हिएट संघराज्याच्या पश्चिमेकडील बाल्टिक किनाऱ्यावरील एक देश आहे. एस्टोनियाचे क्षेत्रफळ ४५,१०० चौ.कि.मी. इतके आहे. याच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पश्चिमेला बाल्टिक समुद्र, आग्नेयेला रिगाचे आखात, दक्षिणेला लॅटव्हिया राज्य आणि पूर्वेस पायपूस सरोवर आणि रशियाची मुख्यभूमी आहे.

एस्टोनियाच्या पश्चिमेला सान्यिमा आणि हिउमा ही मोठी बेटे आणि एकंदर ७० लहान बेटे असून ती एस्टोनियातच येतात. टालिन ही एस्टोनियाची राजधानी आहे.  एस्टोनियाची लोकसंख्या १,३४०,०२१ इतकी आहे. १२ एप्रिल १९१७ हा एस्टोनियाचा स्वातंत्र्य दिवस आहे. एस्टोनिया हे एक कमी उंचीचे पठारच आहे.

रेतीखडक आणि चुनखडीच्या खडकांनी ते बनलेले आहे. पठाराच्या उत्तरेकडील बराच भाग सपाट, रेतीयुक्त आणि दलदलीचा असून काही कड्यासारखा भाग समुद्रापर्यंत पोहोंचलेला आहे. त्यामुळे बाल्टिक समुद्रातील नैसर्गिक बंदरे आणि तेथील अनेक बेटे ही या पठाराच्या पश्चिमेकडील टोकाचे भाग आहे. राज्याची उंची समुद्र सपाटीपासून १०० मी. पेक्षाही कमी आहे. जाड वाळूची भुसभुशीत माती आणि जमिनीत असणारे मोठाले दगड त्यामुळे शेतीला याचा अडथळा होतो. पार्नू ही १२५ कि.मी. लांबीची एकच मोठी नदी या देशात आहे. शिवाय काही लहान मोठ्या उपनद्यांचे प्रवाह येथे असून त्यावर जलविद्युत निर्मिती होते. या प्रदेशाचे हवामान सौम्य खंडांतर्गत आहे. तापमान -५ अंश से. ते १७ अंश से. पर्यंत असते.

पावसाचे प्रमाण ५६ ते ७२ सें.मी. इतके आहे. २२ टक्के क्षेत्र सुचीपर्णी वृक्षांच्या जंगलांनी व्यापले असून १५ टक्के प्रदेश दलदलीचा आहे. पूर्वी येथे प्रामुख्याने शेती केली जात होती; परंतु आता औद्योगिकीकरणामुळे ८० टक्के उत्पन्न उद्योगधंद्यांपासून मिळते.

खाणकाम, शेल खडकापासून तेल काढणे, नैसर्गिक गॅस निर्मिती करणे हे येथील महत्त्वाचे उद्योग आहेत. टालिन हे महत्त्वाचे उद्योगकेंद्र असून तेथे विद्युत यंत्रसामग्री, कापड, कागद, फर्निचर, आटा, टेलिफोन, रेडिओ, शेतीची अवजारे इ. उद्योग चालतात. ओट, बार्ली, अंबाडी, शुगरबीट, बटाटे इ. पिके येथे घेतली जातात. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यापासून दूध उत्पादनाचा धंदा येथे तेजीत आहे. तसेच मच्छिमारीचा उद्योगही येथे मोठ्या प्रमाणात चालतो. एस्टोनियातील मुख्य धर्म ख्रिस्ती असून अधिकृत भाषा एस्टोनियन आहे. क्रून हे येथील चलन आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : तालिन
अधिकृत भाषा : एस्टोनियन
स्वातंत्र्य दिवस : २० ऑगस्ट १९९१ (सोव्हियेत संघापासून)
राष्ट्रीय चलन : युरो (EUR)

( Source : Wikipedia )

Author