शापित बालपण

(Gold)
रसवंतीच्या दुकानावर वरील शब्द कानी पडले, आणि चमकून बघितले तर, एक अकरा बारा वर्षाचा कोवळा मुलगा अंगावर मळकट झालेले कपडे,तुटलेली पायातली चप्पल, व्हिटॅमिन्सच्या डेफिसियन्सी मुळे चेहर्यावरील पांढरे डाग. असे रूप घेऊन माझ्या नजरेस पडला. ‘बरं साहेब’ म्हणून तो लगबगीने रस काढावयाचा यंत्रा जवळ जाऊन, सराईतपणे दोन हातात चार रसाचे ग्लास घेऊन आला पटकन.
मी माझ्या बालपणात रमले आणि नकळतपणे आपल्या आणि त्या मुलाच्या बालपणाची तुलना करू लागले. आपले किंवा इतर सुखवस्तू घरातील मुलांचे बालपण किती सुखावह असते. सुरुवातीला चार पाच वर्षाचा काळ खूपच लाड होत असतो.त्यानंतरही तोंडातून पडेल तो शब्द झेलला जातो. अतिशय चांगल्या प्रतीचे शिक्षण होईल अशी शाळा निवडली जाते. कपड्यांचे खाण्याचे काय लाड होत असतात! हे असं होतं म्हणूनच असे निरागस बालपण पुन्हा पुन्हा यावे असे वाटून, ‘लहानपण देगा देवा’ तोंडातून सहजपणे बाहेर पडते.