विमर्श कथा : १

(Gold)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला.

“राष्ट्रीय स्मारकांचा विध्वंस करून , या देशाच्या परंपरेशी , संस्कृतीशी , ज्ञानाशी आणि मातीशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोह्यांनो , तुमचा मेंदू सडलाय . स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रांतिकारक या देशात होऊन गेले म्हणून तुम्ही जिवंत आहात . त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला म्हणून तुम्ही आज सुखासीन आयुष्य जगत आहात . त्यांची चरित्रं वाचा . त्यांचा त्याग , त्यांनी सोसलेल्या यातना , ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून अवघ्या देशाचा केलेला विचार , संघर्षमय आयुष्य हे सगळं माहितेय तुम्हाला ? हिंदुत्व , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न , हिंदुस्थानच्या सीमा आणि त्यांचे संरक्षण याबद्दल केलेला विचार , देशाच्या एकात्मतेसाठी मांडलेल्या संकल्पना … यातलं काय माहितेय तुम्हाला ? परदेशातून येणाऱ्या अमाप पैशावर जगणारी तुम्ही बांडगुळे आहात , तुम्हाला काय माहिती सावरकर , काय माहिती देशहित ? तुम्ही सगळे देशाला लागलेली वाळवी आहात . देश आतून पोखरत जाणारी वैचारिक , षंढ वाळवी . भ्रम फैलावणारी वाळवी . संपत चाललेली पण संपता संपता देशाचं , समाजाचं , संस्कृती , किती नुकसान करता येईल याचा विचार करणारी वाळवी . त्यासाठी वापरत असलेल्या शब्दांना लाखो करोडो रुपये मलिदा मिळतोय , याच निर्बुद्ध जगण्यात स्वतःचं सुध्दा नुकसान होतंय हे विसरून गेलेली बधीर वाळवी”. तो क्षणमात्र थांबला .

 



Please Login to view Prime Content.