Please Login to view Prime Content.
गोवा

(Gold)
गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. गंमत अशी की दरवर्षी आणखी एका कामानिमित्त गोव्याला जावंच लागतं. थोडक्यात गोव्याच्या दरवर्षी दोन फेर्या ठरलेल्या. एखाद्या वर्षी तीनवेळा सुद्धा जाणं होतं. फेरी कितवीही असो, गोव्याला जायचं म्हणजे अंगात उत्साह संचारतो. हिशेब केला तर आतापर्यंत गोव्याला पंचवीसएक फेर्या सहज झाल्या असतील. पण म्हणून गोव्याला जाण्याचा कंटाळा कधीच घडत नाही. गोवा साद घालतो आणि मी गोव्याला जातो. आतुरतेने, ओढीने. ही ओढ नेमकी गोव्याबाबत का भासते याचं उत्तर देणं कठीण आहे.