कोथिंबीरीचे वडे

p-1839-kothimbir-vade-300

कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरा. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवा. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळा.



साहित्य:- २ जुड्या कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आले बारीक वाटून, १ वाटीभर डाळीचे पीठ, २ टेबलस्पून बारीक रवा, मीठ, १ चिमूट खायचा सोडा, तळण्याकरता तेल.

कृती:- कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरा. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवा. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३