Please Login to view Prime Content.
बर्फातला माणूस

(Gold)
युरोपातले आल्प्स पर्वत हे भटकंतीसाठी गिर्यारोहकांत अत्यंत लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रिआ, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्विट्झरलँड, इत्यादी देशांत पसरलेल्या या पर्वतरांगांत गिर्यारोहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या आल्प्स पर्वतात भटकणाऱ्या काही जर्मन गिर्यारोहकांना १९९१ सालच्या सप्टेंबर महिन्यात, इटली आणि ऑस्ट्रिआ या देशांच्या सीमेजवळच्या योट्झाल खोऱ्याजवळ, बर्फात अर्धवट दडलेला एक मानवी मृतदेह आढळला.