वासांसि जीर्णानि…..

काड काड आवाज करीत ठिणग्या उडाल्या आणि लाकडांनी पेट घेतला. एक माणूस हातात मिठाचा मोठा पुडा घेऊन चितेवर टाकत होता.

‘काय टाकतोय तो?’ भाऊने जवळ उभ्या असलेल्या चिंत्याला विचारले.

‘मीठ’ तो म्हणाला

‘ते कशाला?’ मी,

‘ भूत झाला तर आजवर खाल्या मिठाची आठवण रहावी म्हणून!’ चिंत्या तोंडावर हात ठेवून फिसकन हसला.

‘नालायक आहेस कुठे पण काहीही बोलतोस.’

हा चिंत्या कधी तोंडघाशी पाडेल सांगता येत नाही असा विचार करून मी तेथून दूर झालो.

मागे सरकलो तर कोणाचा तरी खांद्यावर हात पडला. देशमुख होता.

‘तुला कधी कळले?’ त्याने विचारले

‘पट्याचा फोन आला होता.’ मी

‘काय ?’ देशमुख दचकल्या सारखा बोलला.

‘दचकलास का?’

‘अरे गेल्या वर्षी गेला ना तो..’

‘तो पट्या नाही. तो सुमंत चाळीत राहायचा, तो.’ मी

‘तो होय? च्यायला मला वाटले तुझे त्या पटयाशी डायरेक्ट कनेक्शन लागले की काय?’ देशमुख फिसकला.

मी काहीच बोललो नाही. चिंत्या काय आणि हा देशमुख काय, गांभीर्यच नाही या लोकांना. मी इकडे तिकडे पाहिले तर सुर्वे, दांडेकर आणि चव्हाण दिसले. मी हळूच त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो.

‘आजारी होता का रे?’ मी विचारले

‘कोण?मी?’ सुर्वे.

‘तू नाही रे! हा..’ मी चीतेकडे बोट दाखवून म्हणालो.

‘कल्पना नाही! बरेच दिवसात भेटलोच नाही. दांडया तुला कधी भेटला होता?’ सुर्वे.

‘अरे आपण आपल्या बॅचचे गेट टुगेदर केले बघ,, दोन वर्षे झाली..त्या नंतर नाही..’ दांडया.

‘मला गेल्या आठवड्यात भेटला होता.. सागर का काय त्या हॉटेल मधे. सगळी फॅमिली जेवायला आली होती. मुलाचे प्रमोशन झाले म्हणून. मस्त होता. मी भेटायला गेलो तर मला एक पेग घ्यायला लावला आग्रहाने. सगळ्यांची ओळख करून दिली.’ चव्हाण म्हणाला.

‘काय झाले असेल मग?’ मी

‘आता काय व्हायचे या वयात? गेला.. आता काय झाले कोण सांगणार?’ सुर्वे.

‘हो.. पण.. डॉक्टरने काही सांगितले असेल ना?’ मी विचारले.

‘कार्डियाक अरेस्ट. हे बघ मी देखील डॉक्टर आहे. म्हणजे होतो. आता प्रॅक्टिस नाही करत. पण मी अशा म्हाताऱ्यांच्या सर्टिफिकेटवर तेच लिहीत आलो. सोपे असते रे. आपण काय तरुण आहोत? सगळे 75 पुढचे. अरे मी गेलो तरी तेच लिहिणार कोणीही डॉक्टर.’ दांडया.

‘तू थांबणार का?’ चव्हाणने सुर्वेला विचारले

‘कशाला?’ सुर्वे

‘कवटी फुटे पर्यन्त?’ चव्हाण

‘नाही रे.. पावसाळा आहे. ओली आहेत लाकडे. वेळ लागेल..तू निघतोस? काही काम आहे का?’ सुर्वेने विचारले.

‘नाही रे.. पण..’ चव्हाण

‘मग चल माझ्या घरी.. बसू या.. जीएफ आहे.’ सुर्वे म्हणाला

‘आयला .. गर्ल फ्रेंड? या वयात?’ दांडया..

‘ग्लेनफिडीच फुल्ल .. मुलाने आणली परवा .. हाँगकाँगल गेला होता..’ सुर्वे..

‘तुम्ही दोघेच? मी नकोय का?’ दांडयाने विचारले.

‘बस का? तुला काय वेगळे सांगायचे का? चल.... तुझे काय रे?’ सुर्वेने मला विचारले.

‘अं.. ना..म्हणजे मला घरी जायला पाहिजे. आंघोळ वगैरे करून.. मी बघतो..’

‘अरे आता कसली आंघोळ करतोस.. हे बघ आज किती तरी दिवसांनी भेटतोय.. पुन्हा कधी ते काय सांगावे?’

‘कदाचित तेव्हा तिथे आपल्यापैकी कोणी जळत असेल..’ कोण बोलले म्हणून मागे वळून पहिले तर चिंत्या.

‘आई शपथ.. चिंत्या.. च्यायला तू कधी आलास?’’ दांडया जवळ जवळ किंचाळलाच होता. मग स्वतःलाच आवरून हलक्या आवाजात त्याने विचारले,

‘कधी म्हणजे? अरे लाकडे रचायला होतो ना? आपले रेकॉर्ड आहे ते. आशा वेळेस कुठे पण असलो तरी आपण पहिले हजर असतो.’ चिंत्या.

‘तू का रे असा कावराबावरा झाला आहेस? च्यायला तो तिथे जळतोय हा उगाचच..आतून जाळतोय.’ चव्हाण माझ्याकडे पाहून म्हणाला.

‘अरे तसे नाही रे. या अशा वेळेस मला नेहमी अस्वस्थ वाटते.’ मी

‘त्यात काय अस्वस्थ वाटायचे? आज तो जाळतोय. उद्या मी असेन नाहीतर दूसरा कोणी. आणि एक लक्षात ठेव तू जरी असलास तरी आपण असणार बरं का. नेहमीप्रमाणे.. अगदी पहिले लाकूड ठेवण्यापासून. खिं खिं खिं’ चिंत्या खिदळला.

मी चितेकडे पाहिले. आता चांगली पेटली होती. वरची एक दोन लाकडे घसरून पडली तसा आतील त्याचा थोडा आकार दिसला. तसा तो अगदी माझ्याच अंगयष्टीचा होता. मला कसेसे झाले. मी दुसरीकडे मान वळविळी.

‘चिंत्या माझ्या घरी बसतोय आम्ही. येणार ना?’ सुर्वेने चिंत्याला विचारले.

‘म्हणजे? हा काय सवाल झाला? पण एक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे आत्ता.’ चिंत्या

‘मी एकटाच. सगळे बाहेर गेलेत. म्हणजे बायको मंडळाच्या ट्रिपल. मुलगा,सून आणि नात, सुनेच्या माहेरी. अपना ही राज है ..’

‘मग ठीक. मी येतो. पण मला एक टॉवेल, टी शर्ट आणि एक हाफ पॅंट लागेल.’

‘ते कशाला?’ दांडया.

‘उगाच भटाच्या घरात जन्माला आलास. अरे स्मशानातून घरी जाणार. मग आंघोळ नको?’

‘टॉवेल ठीक. पण हाफ पॅंट कशाला?’ चव्हाण

‘अरे हे बघ, मांडी घालून मोकळे होऊन जमिनीवर बसून घेतो आपण. ते खुर्चीत नाही जमत आपल्याला.’ चिंत्या.

‘च्यायला. अवघड आहे. बरं. चल देतो सारे. आणि तुझे काय रे? आंघोळ झाल्यावर तसाच बसणार का तुला देखील चड्डी पाहिजे?’ सुर्वे माझ्याकडे पाहत हसत म्हणाला.

‘मी.. मी.. घरी जाऊन येतो. म्हणजे मला वाटते मी आता नाही सांगत. वेगळा मूड आहे माझा.

‘चूx आहे हा.. बरं तुझे तू ठरव. वेळेवर ये नाहीतर भांडी घासावी लागतील. आम्ही जातो. तू कसा आला आहेस चिंत्या?’

‘चालत.’

‘मग माझी गाडी आहे. दांडया तू?’

‘माझी गाडी आहे. पण मी घरी ठेवतो मग आपण तुझ्या गाडीने जाऊ. च्यायला येताना नेमके पोलिस तोंडाला फुगा लावतील..’

सगळे बोलत निघून गेले. मी हळू हळू पुढे गेलो आणि अग्निसंस्कार ज्याने केले मुलाच्या मागे जाऊन उभा राहिलो. मुलाचा मित्र त्याच्याशी बोलत होता.

‘उद्याचे काय? तू येणार नसशील ना?’ मित्र.

‘उद्या ते अस्थी घेऊन जावे लागेल. परवा मीटिंग ठेव. जास्त लांबवण्यात अर्थ नाही. लाइफ टाइम चान्स आहे. पार्टी मजबूत आहे. परवा सकाळी ठेव.’

‘अरे पण घरी हे असे झालेले. तू कसा येणार?’

‘बघेन.. तुला सांगू का? हे कधी तरी होणार होते. हार्ट वीक झाले होते. म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही सगळ्या फॅमिलीसह पार्टी केली. सगळे सावरतील उद्या. आई देखील.’

मी त्याला न भेटतच मागे वळलो. घराकडे चालू लागलो. मनात विचार चालू होते. ‘जन पळभर हाय हाय' म्हणतात तो पळ इतका छोटा असतो का? डोके सुन्न झाले होते.

घरी पोचताच बायकोने दारातच हातात टॉवेल दिला.

‘सरळ बाथरूममधे जा. आणि कपडे त्या जुन्या बादलीत ठेवा.’

बाथरूम मधे जाऊन मी शॉवर सोडला आणि 2 मिनिटं तसाच त्याच्या खाली उभा राहिलो. गीतेमधील श्लोक आठवला.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।।

ज्याप्रमाणे मनुष्य जुने, जीर्ण झालेले वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.

बायकोने बाहेरून दार वाजवते.

‘अहो झाली की नाही आंघोळ? किती वेळ तो? ही आंघोळ नुसता उपचार आहे तो. या बाहेर. कपडे ठेवलेत पलंगावर.’

मी बाहेर आलो आणि तिने ठेवलेला लेंगा आणि कुर्ता घातला. भांग पाडत असतांना बायको आली.

‘अगं बाई.. कुर्ता केवढा फाटलाय मागून? मला दिसलेच नाही. थांबा दूसरा शर्ट देते.’

मी कुर्ता काढला आणि समोर धरला. आरशात त्या फटलेल्या कुरत्याच्या फटी मधून माझा चेहरा मला दिसला. त्याच्याकडे पाहत मी पुटपुटलो.

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय..’ आणि मला हसू आले. त्या फाटक्या कुरत्याकडे पाहत राहिलो.

काड काड आवाज करीत ठिणग्या उडाल्या आणि लांकडांनी पेट घेतला. एक माणूस हातात मिठाचा मोठा पुडा घेऊन चितेवर टाकत होता.

‘काय टाकतोय तो?’ भाऊने जवळ उभ्या असलेल्या चिंत्याला विचारले.

‘मीठ’ तो म्हणाला

‘तर कशाला’ मी,

‘ भूत झाला तर आजवर खाल्या मिठाची आठवण राहावी म्हणून!’ चिंत्या तोंडावर हात ठेवून फिसकन हसला.

‘नालायक आहेस कुठे पण काहीही बोलतोस.’

हा चिंत्या कधी तोंडघाशी पाडेल सांगता येत नाही असा विचार करून मी तेथून दूर झालो.

मागे सरकलो तर कोणाचा तरी खांद्यावर हात पडला. देशमुख होता.

‘तुला कधी कळले?’ त्याने विचारले

‘पट्याचा फोन आला होता.’ मी

‘काय ?’ देशमुख दचकल्या सारखा बोलला.

‘दचकलास का?’

‘अरे गेल्या वर्षी गेला ना तो..’

‘तो पट्या नाही. तो सुमंत चाळीत राहायचं तो.’ मी

‘तो होय? च्यायला मला वाटले तुझे त्या पटयाशी डायरेक्ट कनेक्शन लागले की काय?’ देशमुख फिसकला.

मी काहीच बोललो नाही. चिंत्या काय आणि हा देशमुख काय गंभीर्यच नाही या लोकांना. मी इकडे तिकडे पाहिले तर सुर्वे, दांडेकर आणि चव्हाण दिसले. मी हळूच त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो.

‘आजारी होता का रे?’ मी विचारले

‘कोण?मी?’ सुर्वे.

‘तू नाही रे! हा..’ मी चितेकडे बोट दाखवून म्हणालो.

‘कल्पना नाही! बरेच दिवसात भेटलोच नाही. दांडया तुला कधी भेटला होता?’ सुर्वे.

‘अरे आपण आपल्या बॅचचे गेट टुगेदर केले बघ,, दोन वर्षे झाली..त्या नंतर नाही..’ दांडया.

‘मला गेल्या आठवड्यात भेटला होता.. अभिलाषा मधे. सगळी फॅमिली जेवायला आली होती. मुलाचे प्रमोशन झाले म्हणून. मस्त होता. मी भेटायला गेलो तर मला एक पेग घ्यायला लावला आग्रहाने. सगळ्यांची ओळख करून दिली.’ चव्हाण म्हणाला.

‘काय झाले असेल मग?’ मी

‘आता काय व्हायचे या वयात? गेला.. आता काय झाले कोण सांगणार?’ सुर्वे.

‘हो.. पण.. डॉक्टरने काही सांगितले असेल ना?’ मी विचारले.

‘कार्डियाक अरेस्ट. हे बघ मी देखील डॉक्टर आहे. म्हणजे होतो. आता प्रॅक्टिस नाही करत. पण मी अशा म्हाताऱ्यांच्या सर्टिफिकेटवर तेच लिहीत आलो. सोपे असते रे. आपण काय तरुण आहोत? सगळे 75 पुढचे. अरे मी गेलो तरी तेच लिहिणार कोणीही डॉक्टर.’ दांडया.

‘तू थांबणार का?’ चव्हाणने सुर्वेला विचारले

‘कशाला?’ सुर्वे

‘कवटी फुटे पर्यन्त?’ चव्हाण

‘नाही रे.. पावसाळा आहे. ओली आहेत लाकडे. वेळ लागेल..तू निघतोस? काही काम आहे का?’ सुर्वेने विचारले.

‘नाही रे.. पण..’ चव्हाण

‘मग चल माझ्या घरी.. बसू या.. जीएफ आहे.’ सुर्वे म्हणाला

‘आयला .. गर्ल फ्रेंड? या वयात?’ दांडया..

‘ग्लेनफिडीच फुल्ल .. मुलाने आणली परवा .. हाँगकाँगल गेला होता..’ सुर्वे..

‘तुम्ही दोघेच? मी नकोय का?’ दांडयाने विचारले.

‘बस का? तुला काय वेगळे सांगायचे का? चल.... तुझे काय रे?’ सुर्वेने मला विचारले.

‘अं ना म्हणजे मला घरी जायला पाहिजे. आंघोळ वगैरे करून.. मी बघतो..’

‘अरे आता कसली आंघोळ करतोस.. ही बघ आज किती तरी दिवसांनी भेटतोय.. पुन्हा कधी ते काय सांगावे?’

‘कदाचित तेव्हा तिथे आपल्यापैकी कोणी जळत असेल..’ कोण बोलले म्हणून मागे वळून पहिले तर चिंत्या.

‘आई शपथ.. चिंत्या.. च्यायला तू कधी आलास?’’ दांडया जवळ जवळ किंचाळलाच होता. मग स्वतःलाच आवरून हलक्या आवाजात त्याने विचारले,

‘कधी म्हणजे? अरे लाकडे रचायला होतो ना? आपले रेकॉर्ड आहे ते. आशा वेळेस कुठे पण असलो तरी आपण पहिले हजर असतो.’ चिंत्या.

‘तू का रे असा कावराबावरा झाला आहेस? च्यायला तो तिथे जळतोय हा उगाचच..आतून जाळतोय.’ चव्हाण माझ्याकडे पाहून म्हणाला.

‘अरे तसे नाही रे. या अशा वेळेस मला नेहमी अस्वस्थ वाटते.’ मी

‘त्यात काय अस्वस्थ वाटायचे? आज तो जाळतोय. उद्या मी असेन नाहीतर दूसरा कोणी. आणि एक लक्षात ठेव तू जरी असलास तरी आपण असणार बरं का. नेहमीप्रमाणे.. अगदी पहिले लाकूड ठेवण्यापासून. खिं खिं खिं’ चिंत्या खिदळला.

मी चितेकडे पाहिले. आता चांगली पेटली होती. वरची एक दोन लाकडे घसरून पडली तसा आतील त्याचा थोडा आकार दिसला. तसा तो अगदी माझ्याच अंगयष्टीचा होता. मला कसेसे झाले. मी दुसरीकडे मान वळविळी.

‘चिंत्या माझ्या घरी बसतोय आम्ही. येणार ना?’ सुर्वेने चिंत्याला विचारले.

‘म्हणजे? हा काय सवाल झाला? पण एक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे आत्ता.’ चिंत्या

‘मी एकटाच. सगळे बाहेर गेलेत. म्हणजे बायको मंडळाच्या ट्रिपल. मुलगा,सून आणि नात, सुनेच्या माहेरी. अपना ही राज है ..’

‘मग ठीक. मी येतो. पण मला एक टॉवेल, टी शर्ट आणि एक हाफ पॅंट लागेल.’

‘ते कशाला?’ दांडया.

‘उगाच भटाच्या घरात जन्माला आलास. अरे स्मशाणातून जाणार मग आंघोळ नको?’

‘टॉवेल ठीक. पान हाफ पॅंट कशाला?’ चव्हाण

‘अरे हे बघ, मांडी घालून मोकळे होऊन जमिनीवर बसून घेतो आपण. ते खुर्चीत नाही जमत आपल्याला.’ चिंत्या.

‘च्यायला. अवघड आहे. बरं. चल देतो सारे. आणि तुझे काय रे? आंघोळ झाल्यावर तसाच बसणार का तुला देखील चड्डी पाहिजे?’ सुर्वे माझ्याकडे पाहत हसत म्हणाला.

‘मी.. मी.. घरी जाऊन येतो. म्हणजे मला वाटते मी आता नाही सांगत. वेगळा मूड आहे माझा.

‘चूx आहे हा.. बरं तुझे तू ठरव. वेळेवर ये नाहीतर भांडी घासावी लागतील. आम्ही जातो. तू कसं आला आहेस चिंत्या?’

‘चालत.’

‘मग माझी गाडी आहे. दांडया तू?’

‘माझी गाडी आहे. पण मी घरी ठेवतो मग आपण तुझ्या गाडीने जाऊ. च्यायला येताना नेमके पोलिस तोंडाला फुगा लावतील..’

सगळे बोलत निघून गेले. मी हळू हळू पुढे गेलो आणि अग्निसंस्कार ज्याने केले मुलाच्या मागे जाऊन उभा राहिलो. मुलाचा मित्र त्याच्याशी बोलत होता.

‘उद्याचे काय? तू येणार नसशील ना?’ मित्र.

‘उद्या ते अस्थि घेऊन जावे लागेल. परवा मीटिंग ठेव. जास्त लांबण्यात अर्थ नाही. लाइफ टाइम चान्स आहे. पार्टी मजबूत आहे. परवा . सकाळी.’

‘अरे पण घरी ही असे झालेले. तू कसं येणार?’

‘बघेन.. तुला सांगू का? हे कधी तरी होणार होते. हार्ट वीक झाले होते. म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही सगळ्या फॅमिली सह पार्टी केली. सगळे सवरतील उद्या. आई देखील.’

मी त्याला न भेटतच मागे वळलो. घराकडे चालू लागलो. मनात विचार चालू होते. ‘जन पळभर हाय हाय म्हणतात’ तो पळ इतका छोटा असतो का? डोके सुन्न झाले होते.

‘सरल बाथरूममधे जा. आणि कपडे त्या जुन्या बादलीत ठेवा.’

बाथरूम मधे जाऊन मी शॉवर सोडला आणि 2 मिनिट तसंच त्याच्या खाली उभा राहिलो. गीतेमधील श्लोक आठवला.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।।

ज्याप्रमाणे मनुष्य जुने, जीर्ण झालेले वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा (देही) जीर्ण झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय..’ आणि मला हसू आले. त्या फाटक्या कुरत्याकडे पाहत राहिलो. मनातील मरगळ, अस्वस्थता सारी संपली. कपाट उघडले आणि नुकतीच घेतलेली नवी पॅंट आणि शर्ट घातला. परफ्यूम मारला आणि मोबाइल उचलून आणि सुर्वेला फोन लावला.

‘काय रे.. संपले नाही ना सगळे? मी येतोय.. निघालोच..’

मी खोलीच्या बाहेर पडलो आणि बायकोला म्हणालो, “आज रात्री जेवयाल नाही. सुर्वेकडे जातोय.’

‘कशाला?’

‘अगं तो हा गेला ना? त्याला श्रद्धांजली आहे..येतो रात्री. बायको काही बोलण्या आधी गाडीची चावी घेऊन लिफ्टमधे शिरलो. स्वतःच्या नव्या कपड्यांवर हात फिरवीत..म्हणालो,

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय ’

-0-0-

प्रदीप ओक

काड काड आवाज करीत ठिणग्या उडाल्या आणि लाकडांनी पेट घेतला. एक माणूस हातात मिठाचा मोठा पुडा घेऊन चितेवर टाकत होता.

‘काय टाकतोय तो?’ भाऊने जवळ उभ्या असलेल्या चिंत्याला विचारले.

‘मीठ’ तो म्हणाला

‘ते कशाला?’ मी,

‘ भूत झाला तर आजवर खाल्या मिठाची आठवण रहावी म्हणून!’ चिंत्या तोंडावर हात ठेवून फिसकन हसला.

‘नालायक आहेस कुठे पण काहीही बोलतोस.’

हा चिंत्या कधी तोंडघाशी पाडेल सांगता येत नाही असा विचार करून मी तेथून दूर झालो.

मागे सरकलो तर कोणाचा तरी खांद्यावर हात पडला. देशमुख होता.

‘तुला कधी कळले?’ त्याने विचारले

‘पट्याचा फोन आला होता.’ मी

‘काय ?’ देशमुख दचकल्या सारखा बोलला.

‘दचकलास का?’

‘अरे गेल्या वर्षी गेला ना तो..’

‘तो पट्या नाही. तो सुमंत चाळीत राहायचा, तो.’ मी

‘तो होय? च्यायला मला वाटले तुझे त्या पटयाशी डायरेक्ट कनेक्शन लागले की काय?’ देशमुख फिसकला.

मी काहीच बोललो नाही. चिंत्या काय आणि हा देशमुख काय, गांभीर्यच नाही या लोकांना. मी इकडे तिकडे पाहिले तर सुर्वे, दांडेकर आणि चव्हाण दिसले. मी हळूच त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो.

‘आजारी होता का रे?’ मी विचारले

‘कोण?मी?’ सुर्वे.

‘तू नाही रे! हा..’ मी चीतेकडे बोट दाखवून म्हणालो.

‘कल्पना नाही! बरेच दिवसात भेटलोच नाही. दांडया तुला कधी भेटला होता?’ सुर्वे.

‘अरे आपण आपल्या बॅचचे गेट टुगेदर केले बघ,, दोन वर्षे झाली..त्या नंतर नाही..’ दांडया.

‘मला गेल्या आठवड्यात भेटला होता.. सागर का काय त्या हॉटेल मधे. सगळी फॅमिली जेवायला आली होती. मुलाचे प्रमोशन झाले म्हणून. मस्त होता. मी भेटायला गेलो तर मला एक पेग घ्यायला लावला आग्रहाने. सगळ्यांची ओळख करून दिली.’ चव्हाण म्हणाला.

‘काय झाले असेल मग?’ मी

‘आता काय व्हायचे या वयात? गेला.. आता काय झाले कोण सांगणार?’ सुर्वे.

‘हो.. पण.. डॉक्टरने काही सांगितले असेल ना?’ मी विचारले.

‘कार्डियाक अरेस्ट. हे बघ मी देखील डॉक्टर आहे. म्हणजे होतो. आता प्रॅक्टिस नाही करत. पण मी अशा म्हाताऱ्यांच्या सर्टिफिकेटवर तेच लिहीत आलो. सोपे असते रे. आपण काय तरुण आहोत? सगळे 75 पुढचे. अरे मी गेलो तरी तेच लिहिणार कोणीही डॉक्टर.’ दांडया.

‘तू थांबणार का?’ चव्हाणने सुर्वेला विचारले

‘कशाला?’ सुर्वे

‘कवटी फुटे पर्यन्त?’ चव्हाण

‘नाही रे.. पावसाळा आहे. ओली आहेत लाकडे. वेळ लागेल..तू निघतोस? काही काम आहे का?’ सुर्वेने विचारले.

‘नाही रे.. पण..’ चव्हाण

‘मग चल माझ्या घरी.. बसू या.. जीएफ आहे.’ सुर्वे म्हणाला

‘आयला .. गर्ल फ्रेंड? या वयात?’ दांडया..

‘ग्लेनफिडीच फुल्ल .. मुलाने आणली परवा .. हाँगकाँगल गेला होता..’ सुर्वे..

‘तुम्ही दोघेच? मी नकोय का?’ दांडयाने विचारले.

‘बस का? तुला काय वेगळे सांगायचे का? चल…. तुझे काय रे?’ सुर्वेने मला विचारले.

‘अं.. ना..म्हणजे मला घरी जायला पाहिजे. आंघोळ वगैरे करून.. मी बघतो..’

‘अरे आता कसली आंघोळ करतोस.. हे बघ आज किती तरी दिवसांनी भेटतोय.. पुन्हा कधी ते काय सांगावे?’

‘कदाचित तेव्हा तिथे आपल्यापैकी कोणी जळत असेल..’ कोण बोलले म्हणून मागे वळून पहिले तर चिंत्या.

‘आई शपथ.. चिंत्या.. च्यायला तू कधी आलास?’’ दांडया जवळ जवळ किंचाळलाच होता. मग स्वतःलाच आवरून हलक्या आवाजात त्याने विचारले,

‘कधी म्हणजे? अरे लाकडे रचायला होतो ना? आपले रेकॉर्ड आहे ते. आशा वेळेस कुठे पण असलो तरी आपण पहिले हजर असतो.’ चिंत्या.

‘तू का रे असा कावराबावरा झाला आहेस? च्यायला तो तिथे जळतोय हा उगाचच..आतून जाळतोय.’ चव्हाण माझ्याकडे पाहून म्हणाला.

‘अरे तसे नाही रे. या अशा वेळेस मला नेहमी अस्वस्थ वाटते.’ मी

‘त्यात काय अस्वस्थ वाटायचे? आज तो जाळतोय. उद्या मी असेन नाहीतर दूसरा कोणी. आणि एक लक्षात ठेव तू जरी असलास तरी आपण असणार बरं का. नेहमीप्रमाणे.. अगदी पहिले लाकूड ठेवण्यापासून. खिं खिं खिं’ चिंत्या खिदळला.

मी चितेकडे पाहिले. आता चांगली पेटली होती. वरची एक दोन लाकडे घसरून पडली तसा आतील त्याचा थोडा आकार दिसला. तसा तो अगदी माझ्याच अंगयष्टीचा होता. मला कसेसे झाले. मी दुसरीकडे मान वळविळी.

‘चिंत्या माझ्या घरी बसतोय आम्ही. येणार ना?’ सुर्वेने चिंत्याला विचारले.

‘म्हणजे? हा काय सवाल झाला? पण एक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे आत्ता.’ चिंत्या

‘मी एकटाच. सगळे बाहेर गेलेत. म्हणजे बायको मंडळाच्या ट्रिपल. मुलगा,सून आणि नात, सुनेच्या माहेरी. अपना ही राज है ..’

‘मग ठीक. मी येतो. पण मला एक टॉवेल, टी शर्ट आणि एक हाफ पॅंट लागेल.’

‘ते कशाला?’ दांडया.

‘उगाच भटाच्या घरात जन्माला आलास. अरे स्मशानातून घरी जाणार. मग आंघोळ नको?’

‘टॉवेल ठीक. पण हाफ पॅंट कशाला?’ चव्हाण

‘अरे हे बघ, मांडी घालून मोकळे होऊन जमिनीवर बसून घेतो आपण. ते खुर्चीत नाही जमत आपल्याला.’ चिंत्या.

‘च्यायला. अवघड आहे. बरं. चल देतो सारे. आणि तुझे काय रे? आंघोळ झाल्यावर तसाच बसणार का तुला देखील चड्डी पाहिजे?’ सुर्वे माझ्याकडे पाहत हसत म्हणाला.

‘मी.. मी.. घरी जाऊन येतो. म्हणजे मला वाटते मी आता नाही सांगत. वेगळा मूड आहे माझा.

‘चूx आहे हा.. बरं तुझे तू ठरव. वेळेवर ये नाहीतर भांडी घासावी लागतील. आम्ही जातो. तू कसा आला आहेस चिंत्या?’

‘चालत.’

‘मग माझी गाडी आहे. दांडया तू?’

‘माझी गाडी आहे. पण मी घरी ठेवतो मग आपण तुझ्या गाडीने जाऊ. च्यायला येताना नेमके पोलिस तोंडाला फुगा लावतील..’

सगळे बोलत निघून गेले. मी हळू हळू पुढे गेलो आणि अग्निसंस्कार ज्याने केले मुलाच्या मागे जाऊन उभा राहिलो. मुलाचा मित्र त्याच्याशी बोलत होता.

‘उद्याचे काय? तू येणार नसशील ना?’ मित्र.

‘उद्या ते अस्थी घेऊन जावे लागेल. परवा मीटिंग ठेव. जास्त लांबवण्यात अर्थ नाही. लाइफ टाइम चान्स आहे. पार्टी मजबूत आहे. परवा सकाळी ठेव.’

‘अरे पण घरी हे असे झालेले. तू कसा येणार?’

‘बघेन.. तुला सांगू का? हे कधी तरी होणार होते. हार्ट वीक झाले होते. म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही सगळ्या फॅमिलीसह पार्टी केली. सगळे सावरतील उद्या. आई देखील.’

मी त्याला न भेटतच मागे वळलो. घराकडे चालू लागलो. मनात विचार चालू होते. ‘जन पळभर हाय हाय’ म्हणतात तो पळ इतका छोटा असतो का? डोके सुन्न झाले होते.

घरी पोचताच बायकोने दारातच हातात टॉवेल दिला.

‘सरळ बाथरूममधे जा. आणि कपडे त्या जुन्या बादलीत ठेवा.’

बाथरूम मधे जाऊन मी शॉवर सोडला आणि 2 मिनिटं तसाच त्याच्या खाली उभा राहिलो. गीतेमधील श्लोक आठवला.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।।

ज्याप्रमाणे मनुष्य जुने, जीर्ण झालेले वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.

बायकोने बाहेरून दार वाजवते.

‘अहो झाली की नाही आंघोळ? किती वेळ तो? ही आंघोळ नुसता उपचार आहे तो. या बाहेर. कपडे ठेवलेत पलंगावर.’

मी बाहेर आलो आणि तिने ठेवलेला लेंगा आणि कुर्ता घातला. भांग पाडत असतांना बायको आली.

‘अगं बाई.. कुर्ता केवढा फाटलाय मागून? मला दिसलेच नाही. थांबा दूसरा शर्ट देते.’

मी कुर्ता काढला आणि समोर धरला. आरशात त्या फटलेल्या कुरत्याच्या फटी मधून माझा चेहरा मला दिसला. त्याच्याकडे पाहत मी पुटपुटलो.

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय..’ आणि मला हसू आले. त्या फाटक्या कुरत्याकडे पाहत राहिलो.

काड काड आवाज करीत ठिणग्या उडाल्या आणि लांकडांनी पेट घेतला. एक माणूस हातात मिठाचा मोठा पुडा घेऊन चितेवर टाकत होता.

‘काय टाकतोय तो?’ भाऊने जवळ उभ्या असलेल्या चिंत्याला विचारले.

‘मीठ’ तो म्हणाला

‘तर कशाला’ मी,

‘ भूत झाला तर आजवर खाल्या मिठाची आठवण राहावी म्हणून!’ चिंत्या तोंडावर हात ठेवून फिसकन हसला.

‘नालायक आहेस कुठे पण काहीही बोलतोस.’

हा चिंत्या कधी तोंडघाशी पाडेल सांगता येत नाही असा विचार करून मी तेथून दूर झालो.

मागे सरकलो तर कोणाचा तरी खांद्यावर हात पडला. देशमुख होता.

‘तुला कधी कळले?’ त्याने विचारले

‘पट्याचा फोन आला होता.’ मी

‘काय ?’ देशमुख दचकल्या सारखा बोलला.

‘दचकलास का?’

‘अरे गेल्या वर्षी गेला ना तो..’

‘तो पट्या नाही. तो सुमंत चाळीत राहायचं तो.’ मी

‘तो होय? च्यायला मला वाटले तुझे त्या पटयाशी डायरेक्ट कनेक्शन लागले की काय?’ देशमुख फिसकला.

मी काहीच बोललो नाही. चिंत्या काय आणि हा देशमुख काय गंभीर्यच नाही या लोकांना. मी इकडे तिकडे पाहिले तर सुर्वे, दांडेकर आणि चव्हाण दिसले. मी हळूच त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो.

‘आजारी होता का रे?’ मी विचारले

‘कोण?मी?’ सुर्वे.

‘तू नाही रे! हा..’ मी चितेकडे बोट दाखवून म्हणालो.

‘कल्पना नाही! बरेच दिवसात भेटलोच नाही. दांडया तुला कधी भेटला होता?’ सुर्वे.

‘अरे आपण आपल्या बॅचचे गेट टुगेदर केले बघ,, दोन वर्षे झाली..त्या नंतर नाही..’ दांडया.

‘मला गेल्या आठवड्यात भेटला होता.. अभिलाषा मधे. सगळी फॅमिली जेवायला आली होती. मुलाचे प्रमोशन झाले म्हणून. मस्त होता. मी भेटायला गेलो तर मला एक पेग घ्यायला लावला आग्रहाने. सगळ्यांची ओळख करून दिली.’ चव्हाण म्हणाला.

‘काय झाले असेल मग?’ मी

‘आता काय व्हायचे या वयात? गेला.. आता काय झाले कोण सांगणार?’ सुर्वे.

‘हो.. पण.. डॉक्टरने काही सांगितले असेल ना?’ मी विचारले.

‘कार्डियाक अरेस्ट. हे बघ मी देखील डॉक्टर आहे. म्हणजे होतो. आता प्रॅक्टिस नाही करत. पण मी अशा म्हाताऱ्यांच्या सर्टिफिकेटवर तेच लिहीत आलो. सोपे असते रे. आपण काय तरुण आहोत? सगळे 75 पुढचे. अरे मी गेलो तरी तेच लिहिणार कोणीही डॉक्टर.’ दांडया.

‘तू थांबणार का?’ चव्हाणने सुर्वेला विचारले

‘कशाला?’ सुर्वे

‘कवटी फुटे पर्यन्त?’ चव्हाण

‘नाही रे.. पावसाळा आहे. ओली आहेत लाकडे. वेळ लागेल..तू निघतोस? काही काम आहे का?’ सुर्वेने विचारले.

‘नाही रे.. पण..’ चव्हाण

‘मग चल माझ्या घरी.. बसू या.. जीएफ आहे.’ सुर्वे म्हणाला

‘आयला .. गर्ल फ्रेंड? या वयात?’ दांडया..

‘ग्लेनफिडीच फुल्ल .. मुलाने आणली परवा .. हाँगकाँगल गेला होता..’ सुर्वे..

‘तुम्ही दोघेच? मी नकोय का?’ दांडयाने विचारले.

‘बस का? तुला काय वेगळे सांगायचे का? चल…. तुझे काय रे?’ सुर्वेने मला विचारले.

‘अं ना म्हणजे मला घरी जायला पाहिजे. आंघोळ वगैरे करून.. मी बघतो..’

‘अरे आता कसली आंघोळ करतोस.. ही बघ आज किती तरी दिवसांनी भेटतोय.. पुन्हा कधी ते काय सांगावे?’

‘कदाचित तेव्हा तिथे आपल्यापैकी कोणी जळत असेल..’ कोण बोलले म्हणून मागे वळून पहिले तर चिंत्या.

‘आई शपथ.. चिंत्या.. च्यायला तू कधी आलास?’’ दांडया जवळ जवळ किंचाळलाच होता. मग स्वतःलाच आवरून हलक्या आवाजात त्याने विचारले,

‘कधी म्हणजे? अरे लाकडे रचायला होतो ना? आपले रेकॉर्ड आहे ते. आशा वेळेस कुठे पण असलो तरी आपण पहिले हजर असतो.’ चिंत्या.

‘तू का रे असा कावराबावरा झाला आहेस? च्यायला तो तिथे जळतोय हा उगाचच..आतून जाळतोय.’ चव्हाण माझ्याकडे पाहून म्हणाला.

‘अरे तसे नाही रे. या अशा वेळेस मला नेहमी अस्वस्थ वाटते.’ मी

‘त्यात काय अस्वस्थ वाटायचे? आज तो जाळतोय. उद्या मी असेन नाहीतर दूसरा कोणी. आणि एक लक्षात ठेव तू जरी असलास तरी आपण असणार बरं का. नेहमीप्रमाणे.. अगदी पहिले लाकूड ठेवण्यापासून. खिं खिं खिं’ चिंत्या खिदळला.

मी चितेकडे पाहिले. आता चांगली पेटली होती. वरची एक दोन लाकडे घसरून पडली तसा आतील त्याचा थोडा आकार दिसला. तसा तो अगदी माझ्याच अंगयष्टीचा होता. मला कसेसे झाले. मी दुसरीकडे मान वळविळी.

‘चिंत्या माझ्या घरी बसतोय आम्ही. येणार ना?’ सुर्वेने चिंत्याला विचारले.

‘म्हणजे? हा काय सवाल झाला? पण एक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे आत्ता.’ चिंत्या

‘मी एकटाच. सगळे बाहेर गेलेत. म्हणजे बायको मंडळाच्या ट्रिपल. मुलगा,सून आणि नात, सुनेच्या माहेरी. अपना ही राज है ..’

‘मग ठीक. मी येतो. पण मला एक टॉवेल, टी शर्ट आणि एक हाफ पॅंट लागेल.’

‘ते कशाला?’ दांडया.

‘उगाच भटाच्या घरात जन्माला आलास. अरे स्मशाणातून जाणार मग आंघोळ नको?’

‘टॉवेल ठीक. पान हाफ पॅंट कशाला?’ चव्हाण

‘अरे हे बघ, मांडी घालून मोकळे होऊन जमिनीवर बसून घेतो आपण. ते खुर्चीत नाही जमत आपल्याला.’ चिंत्या.

‘च्यायला. अवघड आहे. बरं. चल देतो सारे. आणि तुझे काय रे? आंघोळ झाल्यावर तसाच बसणार का तुला देखील चड्डी पाहिजे?’ सुर्वे माझ्याकडे पाहत हसत म्हणाला.

‘मी.. मी.. घरी जाऊन येतो. म्हणजे मला वाटते मी आता नाही सांगत. वेगळा मूड आहे माझा.

‘चूx आहे हा.. बरं तुझे तू ठरव. वेळेवर ये नाहीतर भांडी घासावी लागतील. आम्ही जातो. तू कसं आला आहेस चिंत्या?’

‘चालत.’

‘मग माझी गाडी आहे. दांडया तू?’

‘माझी गाडी आहे. पण मी घरी ठेवतो मग आपण तुझ्या गाडीने जाऊ. च्यायला येताना नेमके पोलिस तोंडाला फुगा लावतील..’

सगळे बोलत निघून गेले. मी हळू हळू पुढे गेलो आणि अग्निसंस्कार ज्याने केले मुलाच्या मागे जाऊन उभा राहिलो. मुलाचा मित्र त्याच्याशी बोलत होता.

‘उद्याचे काय? तू येणार नसशील ना?’ मित्र.

‘उद्या ते अस्थि घेऊन जावे लागेल. परवा मीटिंग ठेव. जास्त लांबण्यात अर्थ नाही. लाइफ टाइम चान्स आहे. पार्टी मजबूत आहे. परवा . सकाळी.’

‘अरे पण घरी ही असे झालेले. तू कसं येणार?’

‘बघेन.. तुला सांगू का? हे कधी तरी होणार होते. हार्ट वीक झाले होते. म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही सगळ्या फॅमिली सह पार्टी केली. सगळे सवरतील उद्या. आई देखील.’

मी त्याला न भेटतच मागे वळलो. घराकडे चालू लागलो. मनात विचार चालू होते. ‘जन पळभर हाय हाय म्हणतात’ तो पळ इतका छोटा असतो का? डोके सुन्न झाले होते.

घरी पोचताच बायकोने दारातच हातात टॉवेल दिला.

‘सरल बाथरूममधे जा. आणि कपडे त्या जुन्या बादलीत ठेवा.’

बाथरूम मधे जाऊन मी शॉवर सोडला आणि 2 मिनिट तसंच त्याच्या खाली उभा राहिलो. गीतेमधील श्लोक आठवला.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।।

ज्याप्रमाणे मनुष्य जुने, जीर्ण झालेले वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा (देही) जीर्ण झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.

बायकोने बाहेरून दार वाजवते.

‘अहो झाली की नाही आंघोळ? किती वेळ तो? ही आंघोळ नुसता उपचार आहे तो. या बाहेर. कपडे ठेवलेत पलंगावर.’

मी बाहेर आलो आणि तिने ठेवलेला लेंगा आणि कुर्ता घातला. भांग पाडत असतांना बायको आली.

‘अगं बाई.. कुर्ता केवढा फाटलाय मागून? मला दिसलेच नाही. थांबा दूसरा शर्ट देते.’

मी कुर्ता काढला आणि समोर धरला. आरशात त्या फटलेल्या कुरत्याच्या फटी मधून माझा चेहरा मला दिसला. त्याच्याकडे पाहत मी पुटपुटलो.

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय..’ आणि मला हसू आले. त्या फाटक्या कुरत्याकडे पाहत राहिलो.

काड काड आवाज करीत ठिणग्या उडाल्या आणि लांकडांनी पेट घेतला. एक माणूस हातात मिठाचा मोठा पुडा घेऊन चितेवर टाकत होता.

‘काय टाकतोय तो?’ भाऊने जवळ उभ्या असलेल्या चिंत्याला विचारले.

‘मीठ’ तो म्हणाला

‘तर कशाला’ मी,

‘ भूत झाला तर आजवर खाल्या मिठाची आठवण राहावी म्हणून!’ चिंत्या तोंडावर हात ठेवून फिसकन हसला.

‘नालायक आहेस कुठे पण काहीही बोलतोस.’

हा चिंत्या कधी तोंडघाशी पाडेल सांगता येत नाही असा विचार करून मी तेथून दूर झालो.

मागे सरकलो तर कोणाचा तरी खांद्यावर हात पडला. देशमुख होता.

‘तुला कधी कळले?’ त्याने विचारले

‘पट्याचा फोन आला होता.’ मी

‘काय ?’ देशमुख दचकल्या सारखा बोलला.

‘दचकलास का?’

‘अरे गेल्या वर्षी गेला ना तो..’

‘तो पट्या नाही. तो सुमंत चाळीत राहायचं तो.’ मी

‘तो होय? च्यायला मला वाटले तुझे त्या पटयाशी डायरेक्ट कनेक्शन लागले की काय?’ देशमुख फिसकला.

मी काहीच बोललो नाही. चिंत्या काय आणि हा देशमुख काय गंभीर्यच नाही या लोकांना. मी इकडे तिकडे पाहिले तर सुर्वे, दांडेकर आणि चव्हाण दिसले. मी हळूच त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो.

‘आजारी होता का रे?’ मी विचारले

‘कोण?मी?’ सुर्वे.

‘तू नाही रे! हा..’ मी चितेकडे बोट दाखवून म्हणालो.

‘कल्पना नाही! बरेच दिवसात भेटलोच नाही. दांडया तुला कधी भेटला होता?’ सुर्वे.

‘अरे आपण आपल्या बॅचचे गेट टुगेदर केले बघ,, दोन वर्षे झाली..त्या नंतर नाही..’ दांडया.

‘मला गेल्या आठवड्यात भेटला होता.. अभिलाषा मधे. सगळी फॅमिली जेवायला आली होती. मुलाचे प्रमोशन झाले म्हणून. मस्त होता. मी भेटायला गेलो तर मला एक पेग घ्यायला लावला आग्रहाने. सगळ्यांची ओळख करून दिली.’ चव्हाण म्हणाला.

‘काय झाले असेल मग?’ मी

‘आता काय व्हायचे या वयात? गेला.. आता काय झाले कोण सांगणार?’ सुर्वे.

‘हो.. पण.. डॉक्टरने काही सांगितले असेल ना?’ मी विचारले.

‘कार्डियाक अरेस्ट. हे बघ मी देखील डॉक्टर आहे. म्हणजे होतो. आता प्रॅक्टिस नाही करत. पण मी अशा म्हाताऱ्यांच्या सर्टिफिकेटवर तेच लिहीत आलो. सोपे असते रे. आपण काय तरुण आहोत? सगळे 75 पुढचे. अरे मी गेलो तरी तेच लिहिणार कोणीही डॉक्टर.’ दांडया.

‘तू थांबणार का?’ चव्हाणने सुर्वेला विचारले

‘कशाला?’ सुर्वे

‘कवटी फुटे पर्यन्त?’ चव्हाण

‘नाही रे.. पावसाळा आहे. ओली आहेत लाकडे. वेळ लागेल..तू निघतोस? काही काम आहे का?’ सुर्वेने विचारले.

‘नाही रे.. पण..’ चव्हाण

‘मग चल माझ्या घरी.. बसू या.. जीएफ आहे.’ सुर्वे म्हणाला

‘आयला .. गर्ल फ्रेंड? या वयात?’ दांडया..

‘ग्लेनफिडीच फुल्ल .. मुलाने आणली परवा .. हाँगकाँगल गेला होता..’ सुर्वे..

‘तुम्ही दोघेच? मी नकोय का?’ दांडयाने विचारले.

‘बस का? तुला काय वेगळे सांगायचे का? चल…. तुझे काय रे?’ सुर्वेने मला विचारले.

‘अं ना म्हणजे मला घरी जायला पाहिजे. आंघोळ वगैरे करून.. मी बघतो..’

‘अरे आता कसली आंघोळ करतोस.. ही बघ आज किती तरी दिवसांनी भेटतोय.. पुन्हा कधी ते काय सांगावे?’

‘कदाचित तेव्हा तिथे आपल्यापैकी कोणी जळत असेल..’ कोण बोलले म्हणून मागे वळून पहिले तर चिंत्या.

‘आई शपथ.. चिंत्या.. च्यायला तू कधी आलास?’’ दांडया जवळ जवळ किंचाळलाच होता. मग स्वतःलाच आवरून हलक्या आवाजात त्याने विचारले,

‘कधी म्हणजे? अरे लाकडे रचायला होतो ना? आपले रेकॉर्ड आहे ते. आशा वेळेस कुठे पण असलो तरी आपण पहिले हजर असतो.’ चिंत्या.

‘तू का रे असा कावराबावरा झाला आहेस? च्यायला तो तिथे जळतोय हा उगाचच..आतून जाळतोय.’ चव्हाण माझ्याकडे पाहून म्हणाला.

‘अरे तसे नाही रे. या अशा वेळेस मला नेहमी अस्वस्थ वाटते.’ मी

‘त्यात काय अस्वस्थ वाटायचे? आज तो जाळतोय. उद्या मी असेन नाहीतर दूसरा कोणी. आणि एक लक्षात ठेव तू जरी असलास तरी आपण असणार बरं का. नेहमीप्रमाणे.. अगदी पहिले लाकूड ठेवण्यापासून. खिं खिं खिं’ चिंत्या खिदळला.

मी चितेकडे पाहिले. आता चांगली पेटली होती. वरची एक दोन लाकडे घसरून पडली तसा आतील त्याचा थोडा आकार दिसला. तसा तो अगदी माझ्याच अंगयष्टीचा होता. मला कसेसे झाले. मी दुसरीकडे मान वळविळी.

‘चिंत्या माझ्या घरी बसतोय आम्ही. येणार ना?’ सुर्वेने चिंत्याला विचारले.

‘म्हणजे? हा काय सवाल झाला? पण एक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे आत्ता.’ चिंत्या

‘मी एकटाच. सगळे बाहेर गेलेत. म्हणजे बायको मंडळाच्या ट्रिपल. मुलगा,सून आणि नात, सुनेच्या माहेरी. अपना ही राज है ..’

‘मग ठीक. मी येतो. पण मला एक टॉवेल, टी शर्ट आणि एक हाफ पॅंट लागेल.’

‘ते कशाला?’ दांडया.

‘उगाच भटाच्या घरात जन्माला आलास. अरे स्मशाणातून जाणार मग आंघोळ नको?’

‘टॉवेल ठीक. पान हाफ पॅंट कशाला?’ चव्हाण

‘अरे हे बघ, मांडी घालून मोकळे होऊन जमिनीवर बसून घेतो आपण. ते खुर्चीत नाही जमत आपल्याला.’ चिंत्या.

‘च्यायला. अवघड आहे. बरं. चल देतो सारे. आणि तुझे काय रे? आंघोळ झाल्यावर तसाच बसणार का तुला देखील चड्डी पाहिजे?’ सुर्वे माझ्याकडे पाहत हसत म्हणाला.

‘मी.. मी.. घरी जाऊन येतो. म्हणजे मला वाटते मी आता नाही सांगत. वेगळा मूड आहे माझा.

‘चूx आहे हा.. बरं तुझे तू ठरव. वेळेवर ये नाहीतर भांडी घासावी लागतील. आम्ही जातो. तू कसं आला आहेस चिंत्या?’

‘चालत.’

‘मग माझी गाडी आहे. दांडया तू?’

‘माझी गाडी आहे. पण मी घरी ठेवतो मग आपण तुझ्या गाडीने जाऊ. च्यायला येताना नेमके पोलिस तोंडाला फुगा लावतील..’

सगळे बोलत निघून गेले. मी हळू हळू पुढे गेलो आणि अग्निसंस्कार ज्याने केले मुलाच्या मागे जाऊन उभा राहिलो. मुलाचा मित्र त्याच्याशी बोलत होता.

‘उद्याचे काय? तू येणार नसशील ना?’ मित्र.

‘उद्या ते अस्थि घेऊन जावे लागेल. परवा मीटिंग ठेव. जास्त लांबण्यात अर्थ नाही. लाइफ टाइम चान्स आहे. पार्टी मजबूत आहे. परवा . सकाळी.’

‘अरे पण घरी ही असे झालेले. तू कसं येणार?’

‘बघेन.. तुला सांगू का? हे कधी तरी होणार होते. हार्ट वीक झाले होते. म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही सगळ्या फॅमिली सह पार्टी केली. सगळे सवरतील उद्या. आई देखील.’

मी त्याला न भेटतच मागे वळलो. घराकडे चालू लागलो. मनात विचार चालू होते. ‘जन पळभर हाय हाय म्हणतात’ तो पळ इतका छोटा असतो का? डोके सुन्न झाले होते.

घरी पोचताच बायकोने दारातच हातात टॉवेल दिला.

‘सरल बाथरूममधे जा. आणि कपडे त्या जुन्या बादलीत ठेवा.’

बाथरूम मधे जाऊन मी शॉवर सोडला आणि 2 मिनिट तसंच त्याच्या खाली उभा राहिलो. गीतेमधील श्लोक आठवला.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।।

ज्याप्रमाणे मनुष्य जुने, जीर्ण झालेले वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा (देही) जीर्ण झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.

बायकोने बाहेरून दार वाजवते.

‘अहो झाली की नाही आंघोळ? किती वेळ तो? ही आंघोळ नुसता उपचार आहे तो. या बाहेर. कपडे ठेवलेत पलंगावर.’

मी बाहेर आलो आणि तिने ठेवलेला लेंगा आणि कुर्ता घातला. भांग पाडत असतांना बायको आली.

‘अगं बाई.. कुर्ता केवढा फाटलाय मागून? मला दिसलेच नाही. थांबा दूसरा शर्ट देते.’

मी कुर्ता काढला आणि समोर धरला. आरशात त्या फटलेल्या कुरत्याच्या फटी मधून माझा चेहरा मला दिसला. त्याच्याकडे पाहत मी पुटपुटलो.

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय..’ आणि मला हसू आले. त्या फाटक्या कुरत्याकडे पाहत राहिलो. मनातील मरगळ, अस्वस्थता सारी संपली. कपाट उघडले आणि नुकतीच घेतलेली नवी पॅंट आणि शर्ट घातला. परफ्यूम मारला आणि मोबाइल उचलून आणि सुर्वेला फोन लावला.

‘काय रे.. संपले नाही ना सगळे? मी येतोय.. निघालोच..’

मी खोलीच्या बाहेर पडलो आणि बायकोला म्हणालो, “आज रात्री जेवयाल नाही. सुर्वेकडे जातोय.’

‘कशाला?’

‘अगं तो हा गेला ना? त्याला श्रद्धांजली आहे..येतो रात्री. बायको काही बोलण्या आधी गाडीची चावी घेऊन लिफ्टमधे शिरलो. स्वतःच्या नव्या कपड्यांवर हात फिरवीत..म्हणालो,

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय ’

-0-0-

प्रदीप ओक

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →