बुद्ध ज्या प्रेमात आहे.

चेहरा या माणसाचा ज्या अलंकारात आहे
पाहिजे मोती मला तो तूच ज्या रत्नात आहे.

तू सुखाच्या पावसाने चिंबण्या रडते सदा मी
या विजेला आसवांच्या पापणीची वात आहे.

वाहत्या जखमेत माझी झोपडी वाहून गेली
तू असा घायाळ माझे घर तुझ्या दुःखात आहे.

हे पहा गजऱ्यात माझ्या फूल तेजाळून आले
ही तुला ओवाळण्याची आस प्राजक्तात आहे.

वाट बघताना तुझी मी हुंदक्याने लखलखावे
या युगाला आसवांच्या चांदण्याची रात आहे.

प्रेमिकांना जाळताना भेटला सिद्धार्थ त्यांना
लोकही प्रेमात पडले बुद्ध ज्या प्रेमात आहे.

अनिल रुक्मिणी पांडुरंग साबळे.

गुरुवार, 15 जानेवारी 2026 8:58:55 PM खारघर नवी मुंबई.