कच्च्या केळ्याचे काप

कच्च्या केळ्याचे काप – Recipe



साहित्य: – ६ कच्च्ची केळी, तळण्याकरिता तेल, मीठ, मिरपूड चवीप्रमाणे, अर्धा चमचा हळद (हवी असल्यास), मिरपुडी ऐवजी लाल तिखटही वारपता येते..

कृती: – केळ्याची साले चिरून काढावीत व केळ्याच्या चकत्या करून उकळलेल्या पाण्यात टाकून अर्ध्या मिनिटाने काढून घ्याव्या व एका कपड्यावर पसरून त्यातील पाण्याचा अंश काढून टाकावा. रिफाईंड तेल गरम करून त्यात या चकत्या गुलाबीसर तळून घ्याव्या. कादावर पसरल्यास तेलाचा अंश राहात नाही. ह्या चकत्या नंतर एका वाऊलमध्ये ठेवून त्यावर मीठ, मिरपूड (वा लाल तिखट) हळद पसरावी व चमच्याने चांगले ढवळावे. केळ्याचे काप तयार झाले. हा बाऊल टेबलावर ठेवावा.

टीप: – चाट मसाला आवडत असल्याल लावावा.

Author