साहित्य: -१५० ग्रॅम प्रॉन्स वाफवून घ्यावे व नंतर तळून घ्यावेत, २ मोठे चमचे बारीक चिरलेली सेलेरी, २ चमचे लिंबू रस, अर्धा चमचा मोहरी पूड, अर्धा चमचा मिरपूड, चवीनुसार मीठ.
कृती :- प्रथम एका बाऊलमध्ये सेलरीची बारीक चिरलेली पाने पसरावीत. त्यावर तळलेले प्रॉन्स अरेंज करावेत. वरून मोहरी पूड, मिरपूड व मीठ भुरभुरावे. चमच्याने लिंबाचा रस सगळीकडे सारखा लागेल असा पसरावा. नंतर हा बाऊल टेबलावर ठेवावा.
Author
Post Views: 6