झटपट मिनी पिझ्झा

झटपट मिनी पिझ्झा – Recipe



साहित्य: – एक स्लाईस ब्रेड (किंवा लहान मिनी पिझ्झा बेसेस), १ मोठा चमचा चिरलेली सिमला मिरची, २ चमचे चिरलेला पालक, २ चमचे चिरलेले टोमॅटो, २ चमचे स्लाईस केलेले बटण मश्रूम, २ मोठे चमचे किसलेले चीज, चवीप्रमाणे मीठ, मिरपूड, टोमॅटो सॉस.

कृती: – ब्रेडचा ताजा स्लाईस किंवा लहान पिझ्झा वेस घेवून त्यावर चमच्याने टोमॅटो सॉस पसरावे. वरून चिरलेली सिमला मिरची, पालक, टोमॅटो, बटण मश्रूम पसरावे. त्यावर मीठ व मिरपूड चवीनुसार भुरभुरावी. सर्वात वर किसलेले चीज पसरावे. ओव्हन गरम करून त्यातील ट्रेमध्ये हे पिझ्झा भाजावेत. वरील चीज गुलावी होईल. भाज्याही शिजल्या जातील. मिनी पिझा तयार झाले.

टीप: – आपल्या आवडीच्या इतर भाज्या वापरल्या तरी चालतील.

Author