चीज मिनी डोसे

चीज मिनी डोसे – Recipe



साहित्य: – १ वाटी उडीद डाळ (८ तास भिजवावी), २ वाट्या रवा, ६ किसलेले चीज क्यूबस्, चवीनुसार मीठ, मिरपूड.

कृती :- आठ तास भिजविलेली उडदाची डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी. एका पातेल्यात ही वाटलेली डाळ व रवा एकत्र करून ४ तास ठेवावे. नंतर त्यात योग्य प्रमाणात मीठ मिसळून ढवळावे. डोसे करता येतील एवढे पातळ मिश्रण असावे. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर फक्त चार इंच व्यासाचा डोसा करावा. त्यावर किसलेले चीज पसरावे. चिमूटभर मिरपूड भुरभुरावी. बाजूने अर्धा चमचा रिफाईंड तेल सोडावे. डोसा उलटावा. मात्र थोड्याच वेळात तव्यावरून काढून घ्यावा. असे ५-६ डोसे एका मोठ्या डिशमधे चांगले अरेंज करून ठेवावेत.

Author