नूडल्स कचोरी

नूडल्स कचोरी – Recipe



साहित्य: -कव्हरसाठी: -दीड वाटी मैदा, ४ मोठे चमचे तेल, चवीनुसार मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा

भरण्यासाठी सारण: -१ वाटी उकडलेल्या चायनीज नूडल्स, १ बटाटा उकडून कुस्करलेला, पाव वाटी गाजर कीस, १ चमचा लसूण पेस्ट, पाव वाटी कोबीचा कीस, १ मोठा चमचा तळलेली मुगाची डाळ, चवीप्रमाणे मीठ, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ बारीक चिरलेल्या मिरच्या.

कृती: – मैद्यात, सोडा, मीठ, १ चमचा तेलाचे मोहन, पाणी घालून पीठ मऊसर मळून एक तास झाकून ठेवावे. सारणाचे साहित्य एकत्र करून हाताने मिश्रण थोडेसे मळावे.
मैद्याच्या लहान पुऱ्या करून त्यात दीड चमचा सारण भरून कचोरी बंद करावी. आकार थोडा चपटा असावा. गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावी.

Author