साहित्य: – ४ मध्यम आकाराचे किसलेले बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, १०० ग्रॅम लोणी (परतण्याकरिता), अर्धा चमचा मिरपूड,
चवीप्रमाणे मीठ, १ मोठा चमचा कॉर्नफ्लोअर.
कृती: – लोणी वगळून सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिसळावे. मध्यम आकाराच्या साबुदाणा वड्यांएवढे वडे करावेत. एका पॅनमध्ये लोणी वितळवून त्यामध्ये हे चपटे वडे लालसर होईपर्यंत, दोन्ही बाजूंनी चांगले परतावे. कुरकुरीत खुसखुशीत रोस्टीज तयार होतात. नुसते खाल्ले तरी चांगले लागतात. आवडीनुसार टोमॅटो सॉस, चिली सॉसबरोबर द्यावेत.
