साहित्य: १ वाटी दुधी भोपळ्याचा कीस, डाळीचे पीठ, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा लाल तिखट (आवडीनुसार), १ चमचा तांदुळाचे पीठ
कृती : – दुधी भोपळ्याचा कीस पिळून पाणी काढून टाकावे. किसात मावेल एवढे डाळीचे पीठ, हळद, मीठ, जिरेपूड, चाट मसाला, तिखट व थोडेसे तांदळाचे पीठ घालून चपटे गोळे करून ते तेलातून तळून काढावेत.
हे कोफ्ते टोमॅटो सॉस सोबत किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत गरमच खाण्यास द्यावेत.
Author
Post Views: 5