साहित्य: – कव्हरचे साहित्य: २ वाट्या मैदा, अर्धा चमचा मीठ, ४ मोठे चमचे तूप.
सारण: -३ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, १ वाटी खवलेला नारळ, १ चमचा गरम मसाला, १ चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा लिंबाचा रस, ५-६ बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, २ चमचे तेल फोडणीसाठी.
कृती: – प्रथम तेल गरम करून त्यात उडदाची डाळ घालावी. नंतर मिरच्यांचे तुकडे, कांदा घालून थोडे परतावे. नंतर ओले खोबरे, मीठ, साखर, गरम मसाला, लिंबू घालून चांगले ढवळावे. हे सारण तयार झाले.
पारीची कृती: – मीठ व तूप फेसून घ्यावे. त्यात मैदा घालून गार पाणी घालून घट्ट गोळा तयार करावा. मैद्याची मध्यम आकाराची पुरी लाटून तिचे मध्यभागी सुरीने कापून दोन भाग करावेत. सामोशाचा त्रिकोणी आकार देऊन त्यामध्ये मावेल एवढे सारण घालून सामोसा बंद करावा. नंतर मंद आचेवर गरम केलेल्या तेलामध्ये तळावा.
