साहित्य: -६ अंडी, १ मोठा चमचा दूध, २ चमचे गव्हाचे पीठ, १ मोठा चमचा ताज्या मक्याच्या दाण्याचे कूट, २ वाट्या वारीक चिरलेल्या भाज्या-कोबी, गाजर, कांदा वगैरे, १ मोठा चमचा बारीक चिरलेला पालक, पाव चमचा जायफळपूड, १ चमचा मिरपूड, चवीप्रमाणे मीठ, परतण्याकरिता तेल.
कृती: -अंडी फोडून फेसून घ्यावीत. त्यामध्ये इतर सर्व साहित्य एकत्र करून थोडे पुन्हा फेटावे. एका नॉनस्टिक पॅनवर, तीन इंच व्यासाची ऑम्लेटस् तेलावर परतावीत. टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्यावीत
Author
Post Views: 4