वांगी काप

वांगी काप – Recipe



साहित्य: -२ मध्यम आकाराची ताजी वांगी, २ मोठे चमचे डाळीचे पीठ, १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा किसलेले चीज.

कृती : – वांग्याच्या मध्यम जाडीच्या चकत्या कापून पाण्यात बुडवून ठेवाव्या. नंतर डाळीचे पीठ, लाल तिखट, मीठ व किसलेले चीज एका बाऊलमध्ये एकत्र करावे. भिजलेला प्रत्येक काप पाण्यातून काढून दोन्ही बाजूस हे पीठ चिकटवावे. एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून दोन्ही बाजूंनी तांबूस होईपर्यंत परतावे. गरम असतानाच डिशमधे घालून सर्व्ह करावेत. पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस आवडीनुसार त्यासोबत द्यावे.

Author