साहित्य: – ८ कोवीची पाने, २ मध्यम आकाराचे वारीक चिरलेले कांदे, १ मोठा चमचा लसूण पेस्ट, १ चमचा तिखट, पाऊण वाटी ओले घेवड्याचे शिजवलेले दाणे, १ चमचा जिरे पावडर, मीठ चवीपुरते. १ वाटी रताळ्याचा उकडून कुस्करलेला लगदा, ४ चमचे तेल.
कृती: – पातेल्यात थोडे पाणी उकळून घ्यावे व त्यात कोबीची पाने दोन मिनिटे ठेवावीत. (ब्लांच) पाने मऊ होतात. एका कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात कांदा, लसूण परतून घ्यावा. त्यात शिजलेले घेवड्याचे दाणे, लाल तिखट, जिरे पावडर, मीठ, रताळ्याचा लगदा घालून ढवळावे. हे सारण तयार झाले. त्याचे आठ भाग करावेत. कोबीची पाने एका ट्रेमध्ये पसरून त्यावर एक एक सारणाचा भाग ठेवून त्याची सुरळी करावी व टूथपिकने टोचावी. असे आठ पार्सल्स तयार करावेत. एका पसरट पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून त्यावर हे पार्सल ठेवावेत. वरून झाकण घालावे. २ मिनिटे मंद आचेवर ठेवून आच बंद करावी. हे पार्सल टोमॅटो सॉससोबत छान लागतात.