गार्लिक ब्रेड विथ मश्रूम, चीज टॉपिंग

गार्लिक ब्रेड विथ मश्रूम, चीज टॉपिंग – Recipe



साहित्य: – फ्रेंच ब्रेड (स्लाईस करून ठेवणे), २ चमचे लसूण पेस्ट, १ चमचा मिरपूड, १०० ग्रॅम अमूल बटर, चवीनुसार मीठ.
टॉपिंग: -२ मोठे चमचे मश्रूमचे तुकडे (कॅन्ड मश्रूम), २ मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा, मॉझरेला चीज, चिली सॉस.

कृती: – प्रत्येक फ्रेंच ब्रेड स्लाईसचे टोस्ट करावेत. लसूण पेस्ट, अमूल वटर व मिरपूड व मीठ एकत्र करून चमच्याने ढवळून एकजीव करावे व ब्रेडच्या एका बाजूला प्रत्येकी १ चमचा लावावे. अशा प्रकारे केलेला प्रत्येक स्लाईस घेवून त्यावर मश्रूम तुकडे, १ चमचा कांदा व १ चमचा किसलेले मॉझरेला चीज असे एकावर एक पसरावे. नंतर ओव्हनमध्ये मध्यम आचेवर ठेवावे. चीज विरघळते.

हे ब्रेडचे टोस्ट गरम असतानाच चिली सॉस सोबत द्यावेत.

Author