व्हेज गार्लिक बॉल्स

व्हेज गार्लिक बॉल्स – Recipe



साहित्य: बॉल्सचे साहित्य: -.
१ वाटी किसलेला कोबी, १ वाटी किसलेले गाजर, अर्धी वाटी मटार दाणे, अर्धी वाटी घेवड्याच्या शेंगा (बारीक चिरलेल्या), दीड वाटी मैदा, १ मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, चिमूटभर अजिनोमोटो, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा मिरपूड.

सॉस: -२ मोठे चमचे टोमॅटो सॉस, १ मोठा चमचा सोया सॉस, २ मोठे चमचे चिली सॉस, दोन चमचे बारीक चिरलेला लसूण.

कृती: – प्रथम वॉल्सचे साहित्य एकत्र करून गोळे तयार करावेत.
पाणी शक्यतो घालू नये (मैद्याचे प्रमाण गरजेनुसार कमी-जास्त करावे) हे गोळे मंद आचेवर लालसर तळून घ्यावेत. दुसऱ्या वाऊलमधे सॉसचे सर्व साहित्य एकत्र करून चमच्याने ढवळावे. ह्या सॉसमध्ये वरील बॉल्स टाकावेत. आकर्षक डिशमध्ये सर्व्ह करावेत.

Author