व्हेज ड्राय मांचुरियन

व्हेज ड्राय मांचुरियन – Recipe



साहित्य: – १ वाटी किसलेला कोबी, १ वाटी किसलेले गाजर, पाव वाटी कांद्याची पात, चिमूटभर अजिनोमोटो, १ वाटी मैदा, १ चमचा कॉर्नफ्लोअर, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा मिरपूड वर लावायचा मसाला: -१ मोठा चमचा टोमॅटो सॉस, अर्धा मोठा चमचा सोया सॉस, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कांद्याची पात, २ चमचे बारीक चिरलेली मिरची, १ मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण,

कृती: – एका वाऊलमध्ये किसलेला कोबी, गाजर, कांदापात अजिनोमोटो, कार्नफ्लोअर, मीठ व मिरपूड एकत्र करावी, त्यात वाटीभर मैदा घालून शक्यतो पाणी न घालता मळावे व लिंबाएवढे गोळे तयार करून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत व एका दुसऱ्या बाऊलमध्ये ठेवावेत.

एका लहान पातेल्यात टोमॅटो सॉस, सोयासॉस, बारीक चिरलेली कांद्याची पात, लसूण व मिरची एकत्र करून चमच्याने ढवळावे. हे मिश्रण प्रथम केलेल्या बॉल्सला लावावे. बॉल्सना सर्व वाजूंनी सारखे लागले पाहिजे. हे झाले व्हेज मांचुरियन, स्टार्टर म्हणून वापरावे.

Author