गार्डन सॅन्डविच

गार्डन सॅन्डविच – Recipe



साहित्य: – ८ ब्रेडचे स्लाईस, १ किसलेले सफरचंद, ३ चमचे मेयॉनीज सॉस, १ चमचा लिंबाचा रस,

२ चीज क्यूबस् (किसून), चवीप्रमाणे मीठ, मिरपूड.

कृती :- ब्रेडच्या कडा कात्रीने कापून घ्याव्या. सफरचंद, मेयॉनिज सॉस, चीज, लिंबाचा रस, मीठ व मिरपूड एकत्र करून ब्रेड स्प्रेड तयार करावे. ब्रेडच्या प्रत्येक स्लाईसवर हे स्प्रेड सुरीने चांगले पसरून लावावे व सॅन्डविचेस तयार करावे. शक्यतो स्लाईसचे ४ भाग करून लहान सॅन्डविचेस कापावी. लहान त्रिकोणी आकाराचे सॅन्डविचेस दिसतातही छान व खाण्यासही सुलभ जातात.

Author