चीज व्हेज टोस्ट सॅन्डविच

चीज व्हेज टोस्ट सॅन्डविच – Recipe



साहित्य: -१० ब्रेड स्लाईसेस (कडा कापून घ्याव्यात), १० चीज सिंगल्स, १५-१६ उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या, १५-१६ टोमॅटोच्या चकत्या, १५-१६ काकडीच्या चकत्या, चवीनुसार मीठ व मिरपूड, अमूल बटर.

कृती: – एका ब्रेड स्लाईसवर उकडलेल्या बटाट्याची एक चकती, टोमॅटोची एक चकती, काकडीची चकती ठेवावी. त्यावर एक चीजचा सिंगल चौकोन ठेवावा. आवडीनुसार चीज ठेवण्यापूर्वी मीठ व मिरपूड भुरभुरावी. वरून दुसरा ब्रेड स्लाईस ठेवून थोडे अमूल बटर चमच्याने लावावे व इलेक्ट्रिक सॅन्डविच टोस्टरमध्ये ठेवून खरपूस भाजावे.

दोन त्रिकोणी टोस्ट होतात. त्याचे पुन्हा दोन भाग करावेत. म्हणजे एका सॅन्डवीच टोस्टचे चार भाग होतात. अशाच तऱ्हेने इतर टोस्टही करावेत. हे लहान टोस्ट खाण्यास सोपे जातात व डिशमध्ये मांडल्यासही छान दिसतात. खाण्यास रुचकर लागतात.

Author