साहित्य: – ८ चीज क्यूवस् (ब्रिटानिया), १ मोठा चमचा बारीक चिरलेला कोबी, १ मोठा चमचा बारीक चिरलेले वीट, अर्धा चहाचा चमचा मिरपूड, चवीनुसार मीठ,
कृती: – ब्रिटानिया चीज क्यूबचे चार सारखे भाग करावेत. आठ क्यूबचे ३२ लहान चौकोन होतात. प्रत्येक चौकोन टूथपिकमध्ये टोचून ओवावा.
प्रथम एका मोठ्या डिशमध्ये किसलेला कोबी हाताने पसरावा. त्यावर किसलेले बीट पसरावे. त्यावर चीजचे टूथपिकमध्ये खोचलेले क्यूबज् चांगले अरेंज करून ठेवावेत. टूथपिक वरच्या बाजूस आले पाहिजेत. म्हणजे उचलून घेण्यास सोपे जाते. या सर्वांवर मीठ व मिरपूड भुरभुरावी.