करंदीचे पॅटीस

साहित्य: १ वाटी सोललेली करंदी, २ कांदे, आले १ मोठा तुकडा, १० ते १२ लसुण पाकळ्या, १ चमचा हळद, तिखट, आवडीनुसार मीठ, १ चमचा गरम मसाला, पावाचे ४ स्लाईस, ६ ते ७ बटाटे, बटरचा चुरा

कृती : कढईत थोडे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात फोडणीला बारीक चिरलेला लसूण व हिंग टाकणे, करंदीला हळद, तिखट, मीठ, आले लसूण लावून घेणे. तेलावर लसूण लाल झाल्यावर त्यात कांदा टाकणे. कांदा लाल झाल्यावर त्यात करंदी टाकणे व नंतर त्यावर लिंबू पिळणे, गरम मसाला टाकणे करंदी शिजवून कोरडी करणे.

बटाटे उकडून घेणे नंतर ते एकजीव करुन घेणे बटाट्यात पावाचा चुरा टाकणे. आले लसूण गोळी टाकणे. मीठ घालून बटाट्याचा गोळा करणे व त्याला वाटीसारखा आकार देऊन त्यात करंदी घालावी व नंतर बटरच्या चुऱ्यात घोळवून तेलावर फ्रायपॅनवर तळावे. खाण्यास रुचकर लागतात.

- सौ. विनया देशमुख

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सौ. विनया देशमुख

Author