खिमा कटलेट

साहित्य : खिमा कटलेट रिखमा अर्धा किलो, दोन बटाटे, दोन ते तीन मोठे कांदे, हळद, तिखट, मीठ, ७ ते ८ लसूण पाकळ्या, तेल, ब्रेड स्लाईस दोन, हिरवी मिरची, कोथिंबीर १ इंच आले, २ अंडी व बटर चुरा प्रथम खिमा स्वच्छ धुऊन त्याला थोडे तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ घालून त्याला मिरची, आले, कोथिंबीर व लसूण यांची गोळी बारीक वाटून चोळून ठेवणे. साधारण अर्धा तास चोळून ठेवल्यास खिमा चांगला मुरतो. दोन बटाटे चांगले उकडून कुसकरुन घ्यावेत. कांदे बारीक चिरुन घ्यावेत.

कृती : प्रथम पातेले तापत ठेऊन त्याच्यात तेल टाकून चिरलेला कांदा लालसर परतून घ्या. मग त्याच्यावर खिमा टाकून चांगला तेल सुटे पर्यंत परतावा. नंतर पातेल्यावर ताटली ठेऊन, ताटलीवर पाणी ओतून वाफेवर शिजवावा. कुकरमध्ये शिजवल्यास २ ते ३ शिट्या करून गॅस बंद करावा नंतर खिमा एकदम सुखा करुन त्यात कुस्करलेला बटाटा व पावाचे स्लाईस मिक्सरमधून काढून घालावे. व त्या खिम्याचे पाहीजे त्या आकाराचे कटलेट करावेत. अंडी फेटून त्यात थोडे मीठ घालावे. नंतर फेटलेल्या अंड्यात कटलेट बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये पोळवून तव्यावर तेल सोडून शॅलोफ्राय करावेत. कटलेट सॉस बरोबर खावेत. खुपच रुचकर व चविष्ट लागतात.

-श्रीमती नलिनी नाचणे

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

Author