साहित्य : शहा चिंबोच्या (स्वच्छ साफ केलेल्या) तीन कांदे, एक मोठी वाटी ओले खोबरे, १५-१८ लसुण पाकळ्या, ३ इंच आले, २ ओल्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, तेल हिंग, १ मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो
मसाले : २ मोठे चमचे सीकेपी मसाला, एक लहान चमचा हळद, अर्धा चमचा शहाजिरे, ७-८ मिरे, दोन छोटे चमचे खसखस, एक छोटा चमचा बडीशेप, एक छोटा चमचा गरम मसाला पावडर.
हिरवे वाटण कृती: १३-१४ पाकळ्या लसुण, चिरलेले ३ इंच आले, २ मिरच्या कोथिंबीर, बडीशेप व शहाजिरे हे सर्व एकत्र वाटून घेणे.
कांदा खोबऱ्याचे तळलेले वाटण: एका भांड्यात तेल गरम करून त्यात ७-८ मिरे, दोन छोटे चमचे खसखस ५-६ पाकळ्या लसुण घालून ३० सेकंद परतावे त्यात तीन उभे चिरलेले कांदे घालावेत मध्यम आचेवर कांदा परतावा कांदा गुलाबी झाल्यावर त्यात एक वाटी ओले खोबरे घालून २ मिनिटपरतावे. मग त्यात सगळे मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक वाटावे.
पेंद्यांचा अर्क: साफ केलेल्या चिंबोऱ्या मधील पेंद्या मिक्सरमध्ये घालून खडबडीत वाटून घ्यावा, मग त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून एकजीव करुन घ्या आणि त्याला ३-४ वेळा वस्त्रगाळ करुन पेंद्यांचा रस काढून घ्या.
मॅरीनेशन : साफ केलेल्या चिंबोऱ्या घेऊन त्यांना सीकेपी मसाला, हळद, चवीनुसार मीठ गरम मसाला पावडर, हिरवे वाटण साधारण १०-१५ मिनीट छान लावून ठेवा.
कालावणाची कृती: एका पसरट भांड्यात एक मोठी पळी तेल घाला तेल गरम होताच त्यात एक चिमुट हिंग घाला. मॅरीनेट केलेल्या चिंबोऱ्या घाला लगेचच बारीक चिरलेला एक टोमॅटो व पैद्यांचा रस घाला मग आचेवर ८-१० मिनिटे परता तेल सुटू लागले की कांदा खोबऱ्याचे वाटण चवीप्रमाणे मीठ (लक्षात ठेबा चिंबोऱ्यांना आधी मीठ घातलेले आहे) घाला व परत चागले ५ मिनिटे परता व आवडीप्रमाणे पाणी घालून निट हलवून घ्या. मिडीयम आचेवर ७-८ मिनीटे उकळी येऊ द्या.
झाले तयार झणझणीत व चमचमीत चिंबोरीचे कालवण खाण्यास तयार त्यावर कोथिंबीर घाला सर्व्ह करा चिंबोरीचे कालवण.
टिप : चिंबोर्या साफ करण्यापुर्वी जीवंत असताना त्यांना चालू नळाखाली नीट धुवून घ्या म्हणजे पोटाला बाधत नाही.
- सौ. कविता प्रथमेश राजे
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन