कोलंबीच्या वड्या

साहित्य: लहान आकाराची कोलंबी, २ मध्यम आकाराचा कांदा, आलं-लसूण-मिरची, कोथिंबीर यांचे वाटण हळद, तिखट, मीठ, ४ चमचे डाळीचे पीठ, बोटभर चिंच, तेल, १ अंडे, ब्रेडक्रम्स, खसखस, गरम मसाला

कृती: कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला हिरवे वाटण, हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ लावून १५ मिनीटे ठेवावे. कांदा बारीक चिरुन तेलावर गुलाबी रंगावर परतुन घ्यावा. त्यावर कोलंबी टाकून चांगली परतून घ्यावी. शिजत आल्यावर त्यात मीठ घालावे. गरम मसाला घालावा, डाळीचे पीठ घालावे व ताटलीला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण थापावे व कुकरमध्ये वाफवून घ्यावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात या वड्या अंड्यामध्ये घोळवून ब्रेडक्रम्स लावून शॅलो फ्राय कराव्यात. गरम गरम खायला द्याव्यात.

- सौ. सुजाता पाणसरे

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सौ. सुजाता पाणसरे

Author