साहित्य : १२ अळूची पाने, ३ वाट्या बेसन, पाऊण वाटी तळलेला मसाला (सुखे खोबरे भाजून वाटणे) अर्धा चमचा गरम मसाला, २ चमचे लाल तिखट, पाव वाटी गूळ, ४ चमचे लिंबाएवढी चिंच, मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे पावडर
कृती : अळुची पाने स्वच्छ धुऊन लाटण्याने थोडी लाटून वरील शिरा काढाव्यात. एका वाडग्यात बेसन घेऊन त्यात हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, थोडा चिंचेचा कोळ, गूळ, जिरे पावडर व पाणी चांगले एकजीव करावे. साधारण घट्ट होईल इतके पाणी घालावे. अळूच्या पानाला विवेच्या कोळाचे पाणी लावावे. त्यावर वरील बेसनाचे मिश्रण लावावे परत दुसरे पान ठेवून त्यावर ४-५ पाने लावून गुंडाळी करावी. अशी गुंडाळी घट्ट करावी आणि मोदकपात्रात २०-२५ मिनीटे वाफ काढावीत.
थंड झाल्यावर पातळ वड्या पाडाव्यात आणि तळाव्यात.
- सौ. उषा देशपांडे
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन