सांजणे

साहित्य: अर्धा कि. सांजणी रवा (किंवा इडली रवा), एका नारळाचे दूध, वेलची, जायफळ पावडर, १ वाटी साखर, केशर (किंवा रंग), चिमूटभर मीठ

कृती: सांजणी रवा एका भांड्यांत थोडा गरम करुन घेणे, १ वाटी जाडसर रवा नारळाचे पातळसर दुधात शिजवून घेणे. रवा मऊसर शिजवावा. नारळाचे दूध काढून घट्टसर दूध वेगळे ठेवावे थोड्या पातळसर दुधात १ वाटी साखर घालून साखर विरघळून घ्यावी. त्यात उरलेला रवा टाकणे व शिजवलेला रवा टाकणे व एकत्र करणे. त्यात थोडे थोडे दूध टाकावे. गुठळ्या मोहल काढणे. अर्धा तास ठेवावे. त्यात मिठाची कणी वेलची पावडर व जायफळ पावडर घालावी. त्यात थोड्या थोड्या वेळाने दुध घालावे पळीतून पडेल इतके करावे. दोन भाग करावे. एक भाग पांढरा ठेवावा. दुसऱ्यात केशरी रंग किंवा केशर घालावा.

थाळ्यामध्ये मिश्रण टाकणे. कुकरमध्ये (शिट्टी न लावता) किंवा ढोकळा स्टँडमध्ये ठेवणे व वाफ आणावी. दुसऱ्या भागात केशर घालून केशरी सांजण करावे त्याला वरुन बदामाचे काप लावावे. नारळाच्या गोड दुधाबरोबर सांजणे खावे.

- सौ. विभा श्रीकांत हजरनिस

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सौ. विभा श्रीकांत हजरनिस

Author