निनांव

साहित्य : चार वाटी डाळीचे पीठ, दोन चमचे गव्हाचे पीठ, ३ वाटी नारळाचे दूध, दोन चमचे साय, ४ वाटी गूळ, वेलवी जायफळ पूड, साखर ४ चमचे, ४ चमचे तूप, चिमूटभर मीठ

कृती : प्रथम जाड बुडाच्या भांड्यांत चार चमचे तूप घालून तूप तापल्यावर त्यात डाळीचे पीठ व गव्हाचे पीठ घालून भाजून घ्यावे व थंड करावे. नारळाचे दूध काढावे व थंड झालेल्या पीठात नारळाचे दूध व चिमूटभर मीठ घालावे. साखर घालावी, गुळ किसून घ्यावा व पीठात घालून मिक्स करणे, हे मिश्रण मिक्सरमधून काढावे. म्हणजे पिठात गुठळ्या राहात नाही. त्यांत वेलची, जायफळ पूड घालावी व गॅसवर भांडे ठेवावे व सतत ढवळत रहावे. गुठळी होता कामा नये. कालण्याला जड लागले की भांड्याखाली जाड तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे. त्यावर (मिश्रणावर) सर्व बाजूने साजूक तूप सोडावे. वरती घट्ट झाकण ठेवावे. झाकणावर छोटा खल किंवा वरवंटा ठेवावा. चांगले होऊन द्यावे. कालथा घालून पाहावा. कालथ्याला मिश्रण चिकटत नाही हेपाहणे. वरती पीठाला तकतकी येते व भांड्याच्या बाजूने सुटले की निनांव तयार झाले. व झाल्यावर त्याच्या जाड वड्या पाडाव्यात.

- सौ. प्रिती अमित मेढेकर

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सौ. प्रिती अमित मेढेकर

Author