अनारसा

साहित्य : जुने तांदूळ, गुळ, तुप, खसखस, केळ, तळण्यासाठी तुप

कृती : अनारसा पीठ: तांदूळ, तीन दिवस पाण्यात शिजत ठेवणे, तीन दिवस पाणी बदलत राहणे, तिराच्या दिवशी तांदूळ फडक्यावर पसरुन कोरडे करणे. किंचीत ओलसर असतानाच ते कुटणे नंतर पीठाच्या चाळणीने चाळणे, जेवढे पीठ निघेल तेवढाच गुळ घेणे. दोन वाट्या पीठास दोन बाढया गुळ व चार चमचे तुप घेणे. पीठ, गुळव तुप एकजीव होईपर्यंत कुटणे चांगले मऊ झाल्यावर त्याचे गोळे करुन डब्यात ठेवणे. पाच सहा दिवसांनी अनारशासाठी पीठ तयार होते एक दोन दिवसांनी डबा उघडून पहाणे फार कोरडे पीठ वाटल्यास त्यात केळे ठेवणे. पीठ मऊ, होते.

अनारसे करायची पद्धत: तयार झालेलेपीठ परातीत मळणे नंतर त्याची पेढ्याएवढी गोळी करणे. पोळपाटावर खसखस पसरुन त्यावर गोळी गोल गोल फिरवणे. कढईत तुप टाकून त्यावर तयार झालेला अनारसा मंद आचेवर खसखसीची बाजूवर घेऊन तळणे.

- श्रीमती मृदुला सु. प्रधान

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– श्रीमती मृदुला सु. प्रधान

Author