साहित्य: १ वाटी चणा डाळ, २ वाटी किसलेला गूळ, पाव वाटी साखर, चिमूटभर मीठ, वेलची, जायफळ पावडर, तेल, २ वाटी बारीक रवा (झीरो नंबर), केशर किंवा केशरी रंग, २ चमचे तेल, दूध पाणी, चिमूटभर मीठ, पोळी लाटण्यासाठी पोळीचा पत्रा, तवा, पोळपाट लाटणे
कृती: पुरण - चणाडाळ दोन ते चार तास चांगली भिजवावी, डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घ्यावी शिजलेल्या डाळीतील पाणी काढावे. व त्यात चिमूटभर मीठ घालावे. गुळ व साखर घालावे मधून मधून हलवत राहावे. पुरण घट्ट झाले की उतरवावे. पुरण गरम असतानाच पुरणयंत्रातून पुरण बारीक करावे. त्यांत वेलची जायफळ पूड घालावी.
रवा भिजवणे - २ वाटी बारीक रवा घेणे. त्याला दोन टेबलस्पून तेल घालून व चिमूटभर मीठ घालून कोरड्या रव्याला चोळून घेणे.
नंतर दूधपाणी केशरी रंग किंवा केशर घालून कणकेसारखा भिजवावा. खूप घट्ट भिजवू नये हा रवा चार ते पाच तास भिजवावा. नंतर त्याला तेल लावावे. जास्त तेलात ठेवू नये. रवा भिजला की रव्याचे दोन पुरी ऐवढे गोळे करावे व त्याच्या पुऱ्या कराव्यात. पत्र्यावर एका पुरीवर पुरणाचा गोळा घ्यावा. व दुसरी पुरी त्यावर ठेवावी व सर्व बाजूने बंद करावी. दोन्ही बाजूने भरपूर तेल लावावे व लाटण्याने हलके पोळी लाटावी व बाजूच्या कडा सुरीने कापाव्यात व तव्यावर हलकेच टाकावी व त्यावर तेल सोडावे. पोळी उलथताना हलकेच उलथावी व चांगली भाजावी. ही पोळी साजूक तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खावी.
- सौ. शिल्पा रोहित मेढेकर
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
साहित्य: १ वाटी चणा डाळ, २ वाटी किसलेला गूळ, पाव वाटी साखर, चिमूटभर मीठ, वेलची, जायफळ पावडर, तेल, २ वाटी बारीक रवा (झीरो नंबर), केशर किंवा केशरी रंग, २ चमचे तेल, दूध पाणी, चिमूटभर मीठ, पोळी लाटण्यासाठी पोळीचा पत्रा, तवा, पोळपाट लाटणे
कृती: पुरण – चणाडाळ दोन ते चार तास चांगली भिजवावी, डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घ्यावी शिजलेल्या डाळीतील पाणी काढावे. व त्यात चिमूटभर मीठ घालावे. गुळ व साखर घालावे मधून मधून हलवत राहावे. पुरण घट्ट झाले की उतरवावे. पुरण गरम असतानाच पुरणयंत्रातून पुरण बारीक करावे. त्यांत वेलची जायफळ पूड घालावी.
रवा भिजवणे – २ वाटी बारीक रवा घेणे. त्याला दोन टेबलस्पून तेल घालून व चिमूटभर मीठ घालून कोरड्या रव्याला चोळून घेणे.